खडसे महाविद्यालयाचा बाँलबँडमिंटन महिला संघ विजयी तर पुरुष संघ तृतीय क्रमांकावर मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायक...
खडसे महाविद्यालयाचा बाँलबँडमिंटन महिला संघ विजयी
तर पुरुष संघ तृतीय क्रमांकावर
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर: नुकत्याच संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे जळगाव क्रीडा विभागाच्या अंतर महाविद्यालय बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यात सतत दुसऱ्या वर्षी श्रीमती जी .जी खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर चा महिला संघाने विजेते पटकावले ,तर पुरुष संघाने तृतीय क्रमांक मिळविला.विजयी संघात -वैष्नवी रत्नपारखी, दिपाली नागरूत, भाग्यश्री सोनी,काजल पाटील,योगिता पाटील, डिम्पल मालचे,मनिषा गरूडे,पुनम भोई,दिक्षा चौधरी ,भूमिका जोहरे, यांचा सहभाग होता तर पुरुष संघात-राहुल धुंदले, रितेश बोदडे, मयूर यमनेरे,जय सन्नासे, रोहीत राजपूत, दिपक वाघ याचा सहभाग होता.
यातून जळगाव विभागाच्या बॉल बॅडमिंटन संघासाठी वैष्णवी रत्नपारखे, मनीषा गरुडे, योगिता पाटील ,पुनम भोई व जय सनान्से,राहुल धुंदले यांची निवड झाली.
निवड झालेले विद्यार्थी आंतरविभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पंकज महाविद्यालय, चोपडा येथे खेळतील. या विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष मा. एडवोकेट रोहिणी ताई खडसे- खेवलकर, उपाध्यक्ष मा. श्री. नारायण दादा चौधरी, सचिव मा. डॉ. दादासाहेब सी. एस. चौधरी, सर्व संचालक मंडळ ,मा. प्राचार्य डॉ.हेमंत महाजन ,उपप्राचार्य डॉ.ए .पी. पाटील ,सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

No comments