सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न शब्बीर खान यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गा...
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
शब्बीर खान यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनावर आधारित कार्यक्रम धनश्री टॉकीज, यावल या वातानुकूलित सभागृहात सादर करण्यात आला.
समारंभात प्रमुख पाहुणे श्री. नरेंद्र नारखेडे सर (खरेदी विक्री संघ सभापती), श्री. विश्वनाथ धनके सर (गट शिक्षणाधिकारी यावल), डॉ. अभय रावते (सामाजिक कार्यकर्ते, यावल) तसेच श्री. शुभम महाजन ( शाळेचे संचालक) व सौ. वेदश्री महाजन, पत्रकार श्री. अरुण पाटील (देशदुत) उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून समारंभाला सुरुवात करण्यात आली.
साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सादरीकरण केले. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा आविष्कार न राहता तरी विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती माता प्रतिमेचे पूजन करून समारंभाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात पाहुण्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या सहभागाबद्दल कौतुक केले.
प्रमुख अतिथींचे शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र महाजन सर, शाळेचे संचालक श्री. शशीकांत फेगडे सर, श्री. गोपाळ महाजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झिनत शेख मॅडम, सौ. अर्चना चौधरी मॅडम, सौ. तृप्ती पवार मॅडम व सौ. मंजुषा साळुंखे मॅडम यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.




No comments