किनगाव येथे स्टेट बँकेचे एटीएम बनले शोपीस. शब्बीर खान यावल प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) देशात राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवहारात सं...
किनगाव येथे स्टेट बँकेचे एटीएम बनले शोपीस.
शब्बीर खान यावल प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
देशात राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवहारात संगणीकृत प्रणालीमुळे दिवसेंदिवस आश्चर्यजनक बदल होत असतांना मात्र किनगाव येथील स्टेट बँकेचे एटीएम याला अपवाद ठरत आहे ग्राहकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून बँकांचे एटीएम मशीन कार्यरत आहेत मात्र किनगाव येथील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गलगत असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन नेहमी बंदच असते एटीएम सेवेबाबत ग्राहकांना बँकांच्या नियमानुसार प्रत्येक व्यवहाराला चार्जही आकारला जातो असे असतांना मात्र किनगाव स्टेट बँकेचे एटीएम मशीन नेहमी का बंद असते कोणत्या कारणामुळे बंद असते हेही ग्राहकांना समजत नाही किनगाव हे यावल तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असून येथे केळी,कपाशी,कांदा व भुसार मालाचेही व्यापारी आहेत तसेच मंगळवारी भरणारा आठवडे बाजार व गुरांच्या बाजारातही मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात व अशा वेळेस व्यापारी तसेच ग्राहकांना बँकांची व एटीएम मशीनची मदत घ्यावी लागते मात्र एटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी येतात किनगाव लगत असलेल्या १८ ते १९ गावातील नागरिकांचा नियमीत व्यवहार किनगाव येथील बँकांमध्ये आहे त्यातच भारतीय स्टेट बँकेत बहुतांश खाते असल्याने बँकेत नेहमी गर्दी असते व २० हजार रुपयांन पर्यंतची रक्कम एटीएम मशीनमधुनच काढा असे बँकेचे म्हणणे आहे मात्र एटीएम मशीन बंद असल्याने पैसे काढणाऱ्यांना बँकेत लाईनीत उभे राहावे लागते व बँकेत मोठया प्रमाणात गर्दी होते तसेच बँकेच्या बहुतांश खातेदारांना बँकेच्या वेळेव्यतिरिक्त पैसे मिळावेत यासाठी एटीएम चा उपयोग करावा लागतो मात्र नेमके अडचणीच्या वेळेस एटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना आपल्याच पैशांचा लाभ घेता येत नाही तसेच कोणाला दवाखान्यासाठी किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी पैसे लागत असल्यास एटीएम मशीन कडे गेले असता एटीएम बंदच दिसते म्हणून परिसरातील ग्राहक नेहमी संताप व्यक्त करतात म्हणून स्टेट बँकेचे अधिकाऱ्यांनी एटीएम मशीन सतत सुरू राहण्यासाठी कार्यवाही करावी व ग्राहकांना होत असलेल्या असुविधेपासून मुक्त करावे अशी मागणी किनगाव सह परिसरातील स्टेट बँकेच्या खातेदारांनी केली आहे.

No comments