adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षक एन. जी. इंगळे यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर......

  शिक्षक एन. जी. इंगळे यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर...... अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मोताळा: - नुकताच शिक्षक फ...

 शिक्षक एन. जी. इंगळे यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर......


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मोताळा:- नुकताच शिक्षक फाउंडेशन संचालित महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनल अर्थात MSP द्वारा “राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ “ श्री अनंतराव सराफ विद्यालय, शेलापूर बु|| ता. मोताळा जि. बुलढाणा येथील सहाय्यक शिक्षक निवृत्ती गोंडू इंगळे यांना जाहीर झालेला आहे. 


सविस्तर असे की, निवृत्ती इंगळे सर हे वरील संस्थेमध्ये १९९१ पासून सहाय्यक शिक्षक ह्या पदावर कार्यरत असुन विदयार्थ्यांना इंग्रजी, चित्रकला व संगीत विषयाचे प्रभावी अध्यापन करतात. इंग्रजी विषयाचे अध्यापन करतांना शैक्षणिक साहित्यांचा वापर, इंग्रजीचे खेळ, Development Of English Speaking Skill असे अनेक कौशल्य वापरतात.  My Easy English Composition Book या पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले असून त्याचे प्रकाशन प्रा. डॉ. झनके पी. ओ. नाहटा कोलेज भुसावळ यांच्या हस्ते झाले. तसेच Innovative Times - 2011 या नियतकालिकाचे प्रकाशन प्राचार्य श्री. .डब्ल्यू.जी.पाटील यांनी केले. 

चित्रकलेच्या अध्यापनात नवनवीन प्रयोग करणे, निसर्गचित्रे, संकल्पचित्रे, मुक्त-हस्त चित्रे, स्थिरचित्रे, स्म्ररणचित्रे, ओरिगामी कागद काम, मुद्रा-ठसे चित्रण, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, माती पासून प्राणी, पक्षी, फळे, मुर्त्या बनविणे. मणी, बांगड्यांचे तुकडे यापासुन सुंदर नक्षीकाम विद्यार्थ्यांना शिकवितात. 

दरवर्षी चित्रकलेच्या एलीमेंटरी व  इंटरमीजीएट परीक्षांचे सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोफत वर्ग घेऊन 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत आहेत. निवृत्ती इंगळे हे हार्मोनियम च्या परीक्षा पास झालेले असुन गीत मंच च्या माध्यमातून विद्यार्थायांकडून देशभक्तीपर गीते, प्रार्थना, बळबळगीते व सांस्कृतिक कार्यक्रम बसवितात, स्नेहसंम्मेलने, किंवा विशिष्ट प्रसंगांचे औचित्य साधुन रांगोळी प्रदर्शने, चित्रकला प्रदर्शने भरवतात. सुंदर फलक लेखन करतात. ह्या व अश्या अनेक उपक्रमांमुळे त्यांना १९९२-९३ मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सृष्टीचे अध्यक्ष मा. श्री. रामदासजी फुटाणे याच्या हस्ते पुणे येथे “राज्यस्तरीय उपक्रमशील कलाशिक्षक ” म्हणून गौरविण्यात आलेले आहे. त्यानंतर १९९९ – २००० मध्ये बालचित्रवाणी निर्माता पुणे  मा. श्री. ज्योतीरामजी कदम यांचेहस्ते “उपक्रमशील कलाध्यापक” म्हणून सत्कार करण्यात आला. सत्र २००६-०७ मध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा उत्कृष्टरीत्या राबवल्यामुळे शासकीय बी.एड कॉलेज, बुलडाणा येथील प्राचार्य मा. डॉ. ए. बी. साळी यांचेह्स्ते “उपक्रमशील कलाध्यापक” म्हणून गौरविण्यात आले.

सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे शिक्षक निवृत्ती इंगळे यांच्या कार्याची  दखल घेत दर्यासागर फाउंडेशन, जळगाव खान्देश तर्फे “ कलाश्री पुरस्कार ” २०१० मध्ये तात्कालीन पालकमंत्री मा. श्री. गुलाबरावजी देवकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. 

त्यांचे अनेक विद्यार्थी जिल्हास्तर , विभागस्तर व  राज्यस्तरावर पोहचलेले असुन अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस झालेले आहेत तर काही इतर विभागात कार्यरत आहेत. त्यांना हार्मोनियम, भजन, चित्र काढणे, खेळ (खो-खो), सहली काढणे, ऐतिहासिक –धार्मिक स्थळांना भेटी देणे, इंग्रजी विषयाचे वाचन, लेखन करणे. अश्या विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या शिक्षकाच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनल अर्थात MSP द्वारा राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार दि. १८ मे २०२५ रोजी सायबर कॉलेज हॉल, कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.

ग्रामसेवा समिती, शेलापूर चे अध्यक्ष व संचालक मंडळ मा. श्री .परागदादा सराफ, श्रीपाददादा सराफ, पांडुरंगजी भोपळे, आत्मारामजी सावळे , प्राचार्य श्री. डी.पी.सपकाळे, सर्व शिक्षक, प्राध्यापक बंधु-भगिनी, शिक्षकेत्त्तर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, मित्र मंडळ हे सर्व  शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.त्यांना व त्याच्या नवनवीन उपक्रमांना खुप खुप शुभेच्छा.

No comments