न्हावी येथील तीन विद्यार्थ्यांना महाज्योती कडून टॅब चे वाटप इदू पिंजारी फैजपूर (संपादक-:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र शासनाचे महात्मा ज्यो...
न्हावी येथील तीन विद्यार्थ्यांना महाज्योती कडून टॅब चे वाटप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाचे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर यांच्याकडून भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय न्हावी येथून जून २०२४ मध्ये इयत्ता दहावी पास झालेले हिमांशू प्रवीण वारके व देवल डिगंबर इंगळे तसेच जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल फैजपूर येथून जून २०२४ मध्ये इयत्ता दहावी पास झालेल्या भाग्येश अनिल फिरके या तिघांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव येथे टॅब देण्यात आले. मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्यांना व ज्यांनी महाज्योतीचे फॉर्म मुदतीत भरले होते अशा निवडक विद्यार्थ्यांना हे टॅब देण्यात आले आहे.

No comments