माझ्या बहिणीला कॉपी का करू दिली नाही शिक्षकांना जिवे मारण्याची धमकी अहिल्यानगर (दि.१२ प्रतिनिधी):- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) बारावी परीक...
माझ्या बहिणीला कॉपी का करू दिली नाही शिक्षकांना जिवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर (दि.१२ प्रतिनिधी):-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालय केंद्रावरील दोन पर्यवेक्षकांना पेपर सुटल्यानंतर ‘माझ्या बहिणीला कॉपी का करू दिली नाही’ अशी विचारणा करत अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ व दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली.तसेच याच केंद्रावरचे केंद्र संचालक हे उत्तरपत्रिका घेऊन पाथर्डीकडे येत असताना त्यांचे वाहन अडवून त्यांना शिवीगाळ करण्यात आली.या घटनेमुळे शिक्षक अत्यंत भयभीत झाले असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.अज्ञात व्यक्ती विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात शिक्षकाने तक्रार दाखल केली आहे.
No comments