कोरपावली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये शिवजयंती साजरी भरत कोळी ता.यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथून जवळच असलेल्...
कोरपावली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये शिवजयंती साजरी
भरत कोळी ता.यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथून जवळच असलेल्या कोरपावली येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्य मनाने शिवजयंती साजरी करण्यात आली जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख कुतुबुद्दीन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख कुतुबुद्दीन जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री धनराज कोळी फिरोज तडवी सर श्री आशिया पटेल तनुजा तडवी यांच्यासह जिल्हापरिषद उर्दू व जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments