संस्कार आईच्या गर्भातच मिळतात - हभप योगेश महाराज इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आईच्या गर्भात संस्कार ठरलेले असतात त्य...
संस्कार आईच्या गर्भातच मिळतात - हभप योगेश महाराज
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आईच्या गर्भात संस्कार ठरलेले असतात त्या संस्कारांमध्ये पैसा, बुद्धी,मान सन्मान,मृत्यू यांचा समावेश असतो. मात्र मानवाला असे वाटते की मी केले.अरे बाबा तू नाही केले तर भगवंताने तुला निमित्त केले , म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवनामध्ये अहंकाराचा लवलेश येऊ देऊ नका. याचे उदाहरण देताना योगेश महाराज चिंचोलीकर म्हणाले संत गोरोबाचे दोन्ही हात गेल्यानंतर भगवंताने मानवाच्या रूपात त्यांच्या घरी येऊन सेवा केली.तेव्हा गोरोबा म्हणाले काय देवासारखे आलात तुम्ही. मात्र संत गोरेबांना हे माहिती नव्हते की ते प्रत्यक्षात देवच आलेले आहे.हीच परमेश्वराचे लिला असते.ज्या भक्तांची निस्वार्थ सेवा असते, जे भक्त नेहमी नामस्मरणाने भगवंतामध्ये लीन असतात. त्या ठिकाणी भगवंत कोणत्यातरी स्वरूपात येत असतो आणि भक्ताला सहकार्य करत असतो. प्रत्येकाला वाटते की देवाने माझ्या घरी यावे पण देवा घरी जायला कोणीच तयार नाही. जो जन्माला आला तो मरणारच आहे.कारण मृत्यू हे अटळ सत्य आहे.म्हणून का मरणाची भीती ठेवायची? जीवन असे जगावे की मरावे परी कीर्ती रुपी उरावे. असे प्रतिपादन ह भ प योगेश महाराज यांनी केले.
ह भ प योगेश महाराज यांनी न्हावी येथे केले.
श्रीनाथ मंदिरात ( विठ्ठल मंदिर ) वै. रामा परशुराम पाचपांडे यांच्या उत्तर कार्यानिमित्त हभप योगेश महाराज चिंचोलीकर यांचे कीर्तन आयोजित केले होते त्याप्रसंगी त्यांनी वरील प्रतिपादन केले .

No comments