रविवारी 'परिस्थितीच्या दुसेरीखाली' कविता संग्रहाचे प्रकाशन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा - येथील ज्येष्ठ कवी...
रविवारी 'परिस्थितीच्या दुसेरीखाली' कविता संग्रहाचे प्रकाशन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा - येथील ज्येष्ठ कवी तथा महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य अशोक नीलकंठ सोनवणे यांच्या 'परिस्थितीच्या दुसेरीखाली' या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन रविवार, २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता प्रताप विद्या मंदिराच्या सभागृहात करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाप्रसंगी नाशिक येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा. रमेश वरखेडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. चांदवड येथील आबड लोढा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. तुषार चांदवडकर हे या कविता संग्रहावर समिक्षणात्मक भाष्य करणार आहेत. तर या प्रसंगी आर्ष पब्लिकेशन्सचे प्रा. दिलीप चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कवी अशोक सोनवणे यांचा हा ४ था काव्य संग्रह असून या अगोदर त्यांच्या १२ साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या 'बंडू जातो त्यांच्या वंशा' या बालनाट्याला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला असून इतर काव्य संग्रहांना विविध स्तरावर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी त्यांच्या विविध साहित्यकृती सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. अशोक सोनवणे हे प्रताप विद्या मंदिराचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
या प्रकाशन समारंभास रसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन अशोक सोनवणे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments