झोडगा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बिएसएफ जवानाचा अकस्मात मृत्यू अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर: बिएसएफ ...
झोडगा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बिएसएफ जवानाचा अकस्मात मृत्यू
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर: बिएसएफ मध्ये कार्यरत मलकापूर तालुक्यातील जवानाचा आज दि.२७ रोजी पहाटे अल्पशा आजाराने अकस्मात मृत्यू झाला.त्या जवानाच्या पार्थिवावर राहत्या गांवी मौजे झोडगा येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे झोडगा येथील रहिवासी उमेश शंकर आव्हाड वय ३४ हा बिएसएफ (सिमा सुरक्षा दल) च्या आसाममधील मासिमपूर येथे बी कंपनीत कार्यरत होता.दि.१ फेब्रुवारी रोजी तो महिन्याच्या रजेवर गांवी आला होता.गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नातेवाईक व मित्र परिवाराच्या भेटीगाठी सुरू होत्या.
दि.२६ रोजी अचानक पोटात दुखायला लागले.त्यामुळे उमेश आव्हाड या जवानाची प्रकृती अचानक बिघडली.त्यामुळे उपचारासाठी तो खाजगी रुग्णालयात दाखल झाला.परंतू उशिरा रात्रीपर्यंत त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.तर कमी झालेला रक्तदाब वाढतच नसल्याने तो अत्यवस्थ झाला.रात्री २.३० वाजेच्या सुमारास त्याला बुलढाणा येथे हलविण्यात आले.
त्या ठिकाणी डॉक्टरांनी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास तपासणी करून जवानास मृत घोषित केले.त्यामुळे नातेवाईकांना एकच धक्का बसला.तर हि बातमी गावाकडे कळल्यावर मौजे झोडगा पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली.कारण ठणठणीत असलेल्या जवानाच्या मृत्यूमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
आज दि.२७ रोजी मृत जवान उमेश आव्हाड च्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याच्या राहत्या गांवी झोडगा येथे आणण्यात आले.संध्याकाळी शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार राहुल तायडे यांनी पार्थिवाला अभिवादन केले.तर पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली जवानाला हवेत तीन राऊंड गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली.त्यावेळी अनेक प्रशासकीय अधिकारी व गावकऱ्यांची उपस्थिती होती.
No comments