दहशत माजविण्याच्या उद्दीष्टाने त्याचे कब्ज्यात गावठी कट्टा (पिस्टल) वापरणारा अटकेत जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) स्थानिक ग...
दहशत माजविण्याच्या उद्दीष्टाने त्याचे कब्ज्यात गावठी कट्टा (पिस्टल) वापरणारा अटकेत
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एरंडोल तालुक्यातील रवंजा बु! गावातील प्रविण कोळी हा दहशत माजविण्याच्या उद्दीष्टाने त्याचे कब्ज्यात गावठी कट्टा (पिस्टल) वापरत असल्याचे बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील पथकाने रवंजा बु! ता. एरंडोल येथे जावून त्याचा शोध घेवून मिळालेल्या बातमीची खात्री करून प्रविण कोळी यास ताब्यात घेवून त्याचे जवळ गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) मिळून आल्याने आरोपी प्रविण अशोक कोळी, वय २२, रा.रवंजा बु! ता. एरंडोल याचे कडून २५०००/- रु किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) जप्त करून त्यांचे विरुध्द एरंडोल पो.स्टे. CCTNS NO १६/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा.श्री. बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी श्री गणेश वाघमारे, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी सर्व नेम. स्थागुशा जळगाव यांनी केली आहे. करण्यात आली आहे.

No comments