एमआयडीसी नगर मनमाड रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त! एमआयडीसी पोलिसांचा चोख बंदोबस्त सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्य...
एमआयडीसी नगर मनमाड रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त!
एमआयडीसी पोलिसांचा चोख बंदोबस्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१३):- अत्यंत गजबजलेल्या नगर मनमाड महामार्गावरील एमआयडीसीतील अनाधिकृत टपऱ्या बांधकामे आज जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने रोडवरील नागापूर व तसेच एमआयडीसीतील महामार्गाला जाण्या येण्यासाठी अडचण ठरणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.भल्या मोठा केलेल्या अतिक्रमणाने रस्त्यांचा श्वास दबला होता परंतु आता हे सर्व अतिक्रमण काढल्याने श्वास मोकळा झाला आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी श्री.सुधीर पाटील, श्री संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग,श्री.संजय शिंदे तहसीलदार, पीडब्ल्यूडी चे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीविनायक पाटील,तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह या अतिक्रमण मोहिमेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त उपस्थित होता.

No comments