जे .टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक २७ /२ /२०२५ ...
जे .टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २७ /२ /२०२५ रोजी व्यास शिक्षण मंडळ संचलित जे .टी. महाजन इंग्लिश यावल या स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण करण्यात आले तसेच मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष श्री. शरद भाऊ महाजन उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रंजना महाजन मॅडम व आय.टी.आय कॉलेज यावल चे प्रवीण झोपे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली नंतर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शाळेतील शिक्षिका सिमरन तडवी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष माननीय .श्री.शरद भाऊ महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात मुलांना अभ्यास व खेळाविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अतिशय सुरेख सूत्रसंचालन श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी पर्यवेक्षिका सौ .गौरी भिरूड मॅडम व श्रीमती.राजश्री लोखंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आभार प्रदर्शन सौ. वर्षा चौधरी मॅम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. अशा रीतीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.
No comments