adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मराठी भाषेचे संवर्धन सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी करायला हवे ..प्रा.खैरनार

  मराठी भाषेचे संवर्धन सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी करायला हवे . .प्रा.खैरनार  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी, (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव...

 मराठी भाषेचे संवर्धन सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी करायला हवे ..प्रा.खैरनार 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी,

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त   महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला

  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.दयाघन राणे (डी. डी. एन. भोळे महाविद्यालय,भुसावळ) हे उपस्थित होते.

प्रारंभी डॉ. दयाघन राणे यांनी 'ग्रीष्म ऋतू' कविता सादर केली.

कु. दिक्षा पंडित हिने कुसुमाग्रजांची 'मायबोली' कविता सादर केली.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. मयुर महाजन (सामाजिक कार्यकर्ते राजोरा) यांनी "मराठी पाऊल पडते पुढे " या विषयावर मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा घसरता पाया, मराठी भाषेवर वेगवेगळ्या बोलींचा पडलेला  प्रभाव, इंग्रजी शब्दांचा भरणा, बदलत्या काळानुसार हौशी, मौजेच्या वस्तू संदर्भात घरात वापरले जाणारे इंग्रजी शब्द ह्यावर सविस्तर मार्गदर्शन करताना तरुणाईने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषेचे ज्ञान प्रत्येकाने आचरणात आणणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवा,दि. ३ ऑक्टोंबर २०२४ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही गौरवास्पद बाब  असली तरी सार्वजनिक जीवनात वावरताना मराठी भाषेचे आचरण होणे महत्त्वाचे आहे. भाषा शुद्ध, अशुद्ध उच्चार बोलताना युवकांमध्ये आपुलकी, भाव  संवर्धन, मराठी साहित्यातील समाज उपयोगी विषयावर उत्कृष्ट संशोधन होणे महत्त्वाचे आहे घराघरात मराठीचा वापर होणे गरजेचे आहे असे सांगितले.

   यावेळी कार्यक्रमाला डॉ. सुधीर कापडे, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी.व्ही. पावरा,  प्रा. मयुर सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामेश्वर निंबाळकर यांनी केले प्रास्ताविक प्रा. सुभाष कामडी यांनी केले  तर आभार प्रा.प्रशांत मोरे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी  

प्रा. हेमंत पाटील, प्रा. इमरान खान, डॉ. निर्मला पवार, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. प्रतिभा रावते, प्रा. छात्रसिंग वसावे,प्रा.अक्षय सपकाळे,प्रा.अर्जुन गाढे,प्रा.ईश्वर पाटील, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे, प्रमोद जोहरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments