युवकांनी मराठी भाषा संवर्धनाचे कार्य हाती घ्यावे- डॉ.ए.पी. पाटील मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनग...
युवकांनी मराठी भाषा संवर्धनाचे कार्य हाती घ्यावे- डॉ.ए.पी. पाटील
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी विभागामार्फत 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते डॉ. ए.पी.पाटील यांनी उपस्थितांना मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले आणि युवकांनी हे कार्य आपल्या हाती घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. दीपक बावस्कर यांनी केले त्यात त्यांनी कार्यक्रमाचे महत्त्व व उपयोगिता विशद केली. तर आभार प्रदर्शन डॉ. छाया खर्चे यांनी केले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,कर्मचारी वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
No comments