सरस्वती विद्या मंदिरात विज्ञानदिना निमित्त वैज्ञानिक माहितीचे चिंतन शब्बीर खान यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) व्यास प्रसादिक ...
सरस्वती विद्या मंदिरात विज्ञानदिना निमित्त वैज्ञानिक माहितीचे चिंतन
शब्बीर खान यावल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
व्यास प्रसादिक एज्युकेशन सोसायटी संचलित,सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय ,यावल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरात करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा एस एम जोशी सर यांनी स्वीकारले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक ए डी चव्हाण सर,ज्येष्ठ शिक्षक एन डी भारुडे,प्रा बी सी ठाकूर, संचालक बी पी वैद्य,एस बी चंदनकार सर, उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाच्या संदर्भामध्ये आपले पोस्टर प्रेसेंटेशन केले. यामध्ये विज्ञानातील अन्नसाखळी, जैवविविधता,भिंग यासारख्या इतर घटकांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाच्या निमित्ताने वैज्ञानिक पोस्टरचे सादरीकरण करीत असताना त्यामध्ये वैज्ञानिक आशय आपल्या सादरीकरणाच्या कौशल्याच्या माध्यमातून विविध चित्रे, मॉडेल या माध्यमातून सादर केला.तसेच सेवानिवृत्त शिक्षक चव्हाण सर यांनी मानवी अवयवांमध्ये हृदय, डोळा ,मेंदू या अवयवांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. ही माहिती देत असताना अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत वैज्ञानिक अवयवांचे वैज्ञानिक कार्य विद्यार्थ्यांना आपल्या शैलीतून पटवून दिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वैज्ञानिक दिनाचे महत्त्व डॉ नरेंद्र महाले यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक एस डी चौधरी,वेदांत सराफ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार डॉ. नरेंद्र महाले यांनी मानले.
No comments