परसाळे ग्रामपंचायतच्या दोन प्रभागांमध्ये पुढे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता ? यावल ( प्रतिनीधी ) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) परसाडे तालुका ...
परसाळे ग्रामपंचायतच्या दोन प्रभागांमध्ये पुढे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता ?
यावल ( प्रतिनीधी )
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
परसाडे तालुका यावल जिल्हा जळगाव येथील तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र स्थगिती मिळणे बाबतच्या अर्ज व अपील नाशिक अप्पर आयुक्त विभाग नाशिक यांच्याकडून अमान्य .. १) खल्लोबाई ईनुस तडवी. २) मदिना सुभेदार तडवी .३) रमजान छबु तडवी यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिनांक ३०/१२/२०२४ रोजी १२ सप्टेंबर २००१ नंतर तीन अपत्य असल्याने अपात्र घोषित केले होते त्याविरुद्ध नाशिक अप्पर आयुक्त यांच्याकडे स्थगिती अर्ज व अपील दाखल केले होते सदर प्रकरणी सामनेवाले यांनी श्री कमाल कान्हा तडवी व सिकंदर इस्माईल तडवी यांनी कॅव्हेट दाखल केले होते त्यावर दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी होऊन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 16 अन्वय अंतरिम आदेश पारित केलेले असून स्थगिती मिळणे बाबतच्या विनंती अमान्य करण्यात आले आहे व अपील फेटाळण्यात आले आहे असे आदेश अजय मोरे अप्पर विभागीय आयुक्त विभाग नाशिक यांनी जिल्हाधिकारी जळगाव व तहसीलदार यावल यांना पुढील कारवाईसाठी अग्रेसित केले आहे सामनेवाले व अपी अपिलार्थी यांना सुद्धा आदेश बजावण्यात आले आहेः यावल तालुक्यात राजकारणात खळबळ उडाली आहे परसाळे ग्रामपंचायतच्या दोन प्रभागांमध्ये पुढे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे

No comments