adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आ.संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने केली तात्काळ कारवाई:अखेर अनाधिकृत गाळे महापालिकेने कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने केले उध्वस्त

 आ.संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने केली तात्काळ कारवाई अखेर अनाधिकृत गाळे  महापालि...

 आ.संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने केली तात्काळ कारवाई

अखेर अनाधिकृत गाळे  महापालिकेने कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने केले उध्वस्त


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)


अहिल्यानगर (दि.११):-अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणांबाबत आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात आज (ता.१०) फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनानंतर सावेडी उपनगरातील पारिजात चौकात असलेल्या तांबटकर मळ्यातील पत्र्याची शेड टपऱ्या हे अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केली.

पारिजात चौक येथे तांबटकर मळा येथे असलेल्या गाळ्यांवर आज अखेर महापालिकेने कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले.यावेळी मोठ्या संख्येने गाळेधारक व जमीन मालक तसेच परिसरातील नागरिक जमा झाले होते.२०२३ साली महापालिकेने संबंधित गाळेधारकांना गाळ्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या होत्या.तरी कुठलीही कारवाई न झाल्याने आज शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेत संबंधित अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासंदर्भात मागणी करत एक तासापासून अधिक काळ आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.त्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत तांबटकर मळा येथील गाळे  उध्वस्त करण्यात आले.यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments