घरफोडी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह रावेर पोलीसांच्या ताब्यात रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर पोलीसां...
घरफोडी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह रावेर पोलीसांच्या ताब्यात
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर पोलीसांनी घरफोडी करून मुद्देमाल पसार करण्याचे प्रयत्नात असलेल्या तीनही संशयित आरोपींना ताब्यात घेत. या तीन संशयित चोरांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर असे की रावेर पोलीस स्टेशन ला दाखल तक्रारीत फिर्यादी रविंद्र सुरेशचंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशन ला दाखल चोरीचा गुन्हा फिर्यादीनुसार, ३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री २ वाफेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात शिरुन १५४० रुपये किंमतीचा रोख रक्कम, ५००० रुपये किंमतीचा मोबाईल, आणि २००० रुपये किंमतीचा जुना रेडीओ चोरून नेला. एकूण ८ हजार ५४० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.
याबाबत रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयसवाल यांच्या युक्तीने तसेच
गोपनिय माहितीनुसार तपास चक्र फिरवून तीन संशयित आरोपींना अटक करुन ताब्यात घेतले. आरोपी मिटू सटवा काळे (वय-६० वर्षे, घाणेगाव जंव समर्थ कुभार, पिंपळगांव, ता. घनसावंगी, जि. जालना), संदीप बबन चव्हाण (३० वर्षे, रेल्वे स्टेशन जवळ, परतूर, ता. परतूर, जि. जालना), राकेश सिताराम काळे (४० वर्षे, मंगळुर, ता. मानोद, जि. परभणी) यांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशीत आरोपींनी घरफोडी करुन चोरी केल्याचे कबूल केले
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकडॉ. विशाल जयस्वाल, यांच्या मार्गदर्शनाखाली म पो उप नि प्रिया वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम तांबे, आणि अमंलदार पो.हे का . सुनील बंजारी पो.कॉ सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, श्रावण भिल आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली

No comments