जिल्हयातुन हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारास एलसीबीने ठोकल्या बेड्या ५अवैध दारू विक्रेत्यांवर छापे मारून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्...
जिल्हयातुन हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारास एलसीबीने ठोकल्या बेड्या
५अवैध दारू विक्रेत्यांवर छापे मारून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (दि.८ प्रतिनिधी):-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्हयातुन हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून तसेच ५ अवैध दारू विक्रेत्यांवर छापे मारून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांच्या आदेशाने दि.०७ फेब्रुवारी रोजी पथक शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत फरार पाहिजे आरोपी व अवैध धंदयाची माहिती घेत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,अहिल्यानगर जिल्हयातुन हद्दपार केलेला इसम नामे सागर भाऊसाहेब गायकवाड (रा.शिर्डी,ता.राहाता) हा नवीन बाजारतळ येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन संशयीत इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.त्यास पथकाची ओळख सांगुन नाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) सागर भाऊसाहेब गायकवाड, रा.नवीन बाजारतळ, बिरोबा रोड, शिर्डी ता.राहाता, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. पथकाने अभिलेखाची खात्री केली असता त्यास दिनांक २२/११/२०२४ पासुन ६ महिन्याकरीता अहिल्यानगर जिल्हयातुन हद्दपार केले असल्याचे निष्पन्न झाले.पथकाने ताब्यातील आरोपी विरूध्द शिर्डी पोलीस स्टेशन गुरनं 110/2025 म.पो.का.क.142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन,पंचासमक्ष ०५ वेगवेगळया ठिकाणी कारवाई केली.त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये ०५ गुन्हे दाखल करण्यात आले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव,अंमलदार गणेश भिंगारदे,रोहित येमुल, प्रमोद जाधव,रमीजराजा आत्तार,बाळासाहेब नागरगोजे, अरूण मोरे यांनी केलेली आहे.

No comments