निमगव्हाण येथील त्यागमुर्ती रमाबाई यांची जयंती रमाई गट आणि भिमाई गट कडून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेम...
निमगव्हाण येथील त्यागमुर्ती रमाबाई यांची जयंती रमाई गट आणि भिमाई गट कडून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
निमगव्हाण येथील त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची 127 वी जयंती रमाबाई स्वयं सहाय्यता गट व भिमाई स्वयं सहाय्यता गट च्या महिलांकडून मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.रमाई गट द्वारे त्यागमुर्ति रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून केक कापून आनंद साजरा करतात आला.
जयश्री बाविस्कर यांनी सामूहिक पंचशील बोलून रमाबाई आंबेडकर यांच्या कार्य विषयी मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमांची प्रास्ताविक संगीता बाविस्कर यांनी सादर केली.टिना बाविस्कर,चांदणी बाविस्कर,निकिता बाविस्कर,उषा बिऱ्हाडे,सपना बाविस्कर,पूनम मैराळे,विमल थोरात,गायत्री थोरात यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.तर वत्सलाबाई,जिजाबाई,लताबाई,मीराबाई,सकूबाई व कलाबाई आदी महिला उपस्थित होत्या.

No comments