नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून अकालपट्टी करा - एकता संघटनेची मागणी. ...
नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून अकालपट्टी करा - एकता संघटनेची मागणी.
(जळगाव प्रतिनिधी, शेख जावीद )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्यात देशद्रोही कार्यवाया करणारे मदरसे असून तेअतिरेक्यांचे अड्डे आहेत तेथे अतिरेकी घडविले जातात सदर मदरसे हे अतिरेक्यांना दूध पाजणारे आहे या मदरशामध्ये देश विरोधी कारवाया चालतात अक्कलकुवाच्या मदरसा मध्ये सुद्धा यमेनचा अतिरेकी सापडला यापूर्वी विशालगड मदरसा मध्ये सुद्धा अतिरेकी सापडून आलेला आहे म्हणून सर्व मदरस्यांचे सर्च ऑपरेशन करून तेथील अतिरेकी व शस्त्रसाठा जप्त करा व त्यासाठी एसआयटीची नेमणूक करा अशी मागणी नितेश राणे यांनी पत्रकार परिषदे मार्फत केल्याने त्यांच्या या १४ मिनिटांच्या मुलाखतीमुळे त्यांनी दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने असे वक्तव्य केलेले आहेत तसेच धार्मिक तेढ व द्वेष वाढवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडणे शक्य आहे. त्यांच्या या वेछूट व असत्य वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यारोप त्यांनी केलेले आहेत,लोकसेवक असून त्यांनी विशिष्ट समाजाच्या लोकांना क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने कायद्याची अवज्ञा केलेली आहे. तसेच त्यांनी मुस्लिम धर्माचा व श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धी पुरस्पर व दुष्ट हेतूने कृती केलेली आहे त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे समाजातील व खास करून मुस्लिम धर्म व्यक्तींच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत म्हणून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी व त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्हा एकता संघटना व अल हुफाज फाउंडेशन मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर निदर्शने करून अपर दंडाधिकारी भीमराव दराडे यांच्या मार्फत तक्रार अर्ज देउन करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणा दुपारी तीन ते चार या एक तासा पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर संघटनेतर्फे विविध घोषणा देण्यात आल्या त्यात नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा , महाराष्ट्र राज्यात द्वेष निर्माण करणाऱ्या विरुद्ध कारवाई करा अशा विविध घोषणा देऊन सरकारचे लक्ष देण्यात आले अपर जिल्हा दंडाधिकारी यांना तक्रार अर्ज सादर एकता संघटनेचे मुफ्ती खालीद व फारुक शेख यांच्यासह हाफिज परवेज, हाफिज रहीम पटेल, हाफिज वसीम कारी, कारी शफिक पटेल, हाफिज इमरान, यांनी अप्पर जिल्हा दंडाधिकारी भीमराव दराडे यांना नितेश राणे यांच्या विरोधातील तक्रार अर्ज सादर केला व माननीय मुख्यमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याचे दराडे यांनी आश्वासन दिले.निदर्शनात यांची होती उपस्थिती मुफ्ती खालीद, फारुक शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल, मौलाना इमरान, सलीम इनामदार, बाबा देशमुख, अनिस शहा, मतीन पटेल, मजहर खान, युसुफ बुलेट, अजीम शेख, आरिफ देशमुख, अजय पाटील, सुष्मिता भालेराव, अमोल ठोंबरे, रेखा जाधव, वसीम शेख, नजमुद्दीन शेख, इमरान गणी, सय्यद इरफान अली, रिजवान शेख, यासीर देशमुख, वकार शेख, सय्यद इरफान, रज्जाक पटेल, अकिल मणियार ,वसीम रफिक, वसीम रियाज ,अबूबकर शेख, याकुब शेख, आवेश खाटीक, मतीन देशपांडे, शेख अक्रम खान, आदींची उपस्थिती होती

No comments