चोपडा येथे कुष्ठरोग शोध मोहीम आज दिनांक 13/02/2025 चे कुष्ठरोग शोध मोहिम चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) चोपडा आज दिनांक 13/02...
चोपडा येथे कुष्ठरोग शोध मोहीम
आज दिनांक 13/02/2025 चे कुष्ठरोग शोध मोहिम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
चोपडा आज दिनांक 13/02/2025 चे कुष्ठरोग शोध मोहिम (एलसीडीसी) बाबत पर्यवेक्षण व पडताळणी साठी डॉ रंगनाथन,वंशिका बंसल मॅडम केंद्रीय कुष्ठरोग पथक गवनवी दिल्ली तसेच डॉ नितीन भालेराव सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग पुणे व्यंकटेश पाठक राज्यस्तरीय अवैद्यकीय पर्यवेक्षक यांनी भेट दिली यामध्ये प्रा.आ.केंद्र व पंचक उपकेंद्र कार्यालयत भेट दिली.प्रत्यक्ष फीडवर जाऊन एलसीडीसी सर्वे कसा केलेला आहे
व करत आहेत ची तपासणी तसेच प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र स्तरावरील सर्व रेकॉर्ड तपासणी केली.एलसीडीसी व इतर एनएलईप कामातील अहवाल नोंद करून कुष्ठरूण शोध अभियानाचा आजपर्यंतचा कामाचा आढावा घेऊन पडताळणी केली.तसेच यावेळी डॉ जयवंत मोरे सर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग जळगाव,डॉ.प्रदीप लासुरकर तालुका आरोग्य अधिकारी चोपडा,एन जे चौधरी एनएमएस जळगाव,जे.के.मोरे आरोग्य सहायक,जे.वाय.बाविस्कर आरोग्य पर्यवेक्षक,हेमंत कुलकर्णी एम एम ए जळगाव,सलीम तडवी एन एम ए रावेर,ए.एस.दौड एन एम ए,प्रमोद पाटील एस टी एस, दिलवर सिंग वळवी आय एफ एम, आर.जे.पाटील पी डब्ल्यू एम राजू पाटील शिपाई हे उपस्थित होते.तसेच सदर टीम ने उपजिल्हा रुग्णालय चोपडा ला भेट दिली व डॉ.सुरेश पाटील वैद्यकीय अधीक्षक चोपडा,डॉ.चंद्रहास पाटील यांचीशी चर्चा केली.तसेच एल आर सी व ओपीडी या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले.सदर तालुक्याच्या कामकाजाबाबत टीम ने समाधान व्यक्त केले.


No comments