adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कु. दक्ष विनोद गायकवाडची टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

 कु. दक्ष विनोद गायकवाडची टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड दक्ष गायकवाड  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक -:-हेमक...

 कु. दक्ष विनोद गायकवाडची टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दक्ष गायकवाड 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र  व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक आयोजित १४ वर्षे आतील राज्य अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली.त्यामध्ये निफाड येथील क्रीडा सह्याद्रीचा खेळाडू दक्ष विनोद गायकवाड याची महाराष्ट्र संघात व राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचे  निफाड तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राज्य स्तरीय १४ वर्षे आतील स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी , वूमन धनश्री गिरी ,महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे इत्यादी उपस्थित होते. क्रीडा सह्याद्री चा खेळाडू कु. दक्ष विनोद गायकवाड याची नाशिक संघात निवड झालेली होती त्याने  राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची ऑलराऊंडर म्हणून महाराष्ट्र संघात निवड झालेली असून राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा मथुरा येथे होत आहे ,दक्ष गायकवाड त्याची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी , उपाध्यक्ष विलास गिरी,  धनश्री गिरी , धनंजय लोखंडे व नाशिक जिल्हा विलास गायकवाड, बाळकृष्ण वाळुंज, माहिती अधिकार पत्रकार संघाचे सचिव विनोद गायकवाड ,राहुल कुलकर्णी ,,क्रीडा  सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड क्रीडा सह्याद्री सदस्य ,रमेश वडघुले,प्रतीक्षा कोतकर ,कीर्ती कोटकर,निलम बेंडकुळे ,विजय  घोटेकर ,लखन घडमाळे , यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments