adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महावितरणच्या योजनांना गती द्या:खा.नीलेश लंके यांची मागणी

  महावितरणच्या योजनांना गती द्या:खा.नीलेश लंके यांची मागणी  अहिल्यानगर (प्रतिनिधी):- (संपादक-:- हेमकांत गायकवाड) महावितरणअंतर्गत असलेल्या के...

 महावितरणच्या योजनांना गती द्या:खा.नीलेश लंके यांची मागणी 


अहिल्यानगर (प्रतिनिधी):-

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

महावितरणअंतर्गत असलेल्या केंद्र सरकारच्या आर. डी. एस. एस. योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांना गती द्या अन्यथा सबंधित ठेकदारास ब्लॅक लिस्ट करा अशी आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय स्थायी उर्जा समितीच्या बैठकीत केली.केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभुमीवर खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये उर्जा क्षेत्राविषयी नवीन ध्येय धोरणे ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी खासदार नीलेश लंके यांनी  समितीचे सदस्य या नात्याने नगर दक्षिण मतदार संघातील  महावितरणच्या विविध विषयांवर समितीचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना खासदार लंके यांनी सांगितले की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील  केंद्र सरकारच्या आर.डी.एस.एस.योजने अंतर्गत १८६ फिडरचे काम सुरू असून ही योजना केंद्र सरकारच्या  सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा भाग आहे. वीज वितरण कंपन्यांच्या कार्यक्षमता आणि आर्थिक स्थैर्य सुधारण्याचा त्यामागे उद्देश आहे. नुकसान कमी करणे, पायाभुत सुविधा अद्यायवत करणे, विश्वासार्ह वीज पुरवठा सुनिश्चित करणे यावर या योजनेत भर देण्यात आलेला आहेे. तसेच त्यात एच.टी. व एल. टी.लाईन विस्तारीत करणे, पोल उभारणे, नवे ट्रान्सफॉर्मर बसविणे व त्याअनुषंगाने सध्या कामे सुरू असून ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने खा. लंके यांनी यावेळी स्पष्ट केले. 

दोन वर्षात १० टक्केही काम नाही ! 

केंद्र शासनाची ही योजना एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली असून सरकारच्या आरडीडीएसएस योजनेतून नगर जिल्हयात ३ हजार ३७४ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये वीज वितरणाच्या पायाभूत सुधारणा, स्मार्ट मिटरींग आणि इतर संबंधित उपक्रमांचा समावेश आहे. ही कामे केवळ १८ महिन्यांच्या आत पुर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. दोन वर्षात १० टक्केही काम पुर्ण झालेले नाही.

एजन्सीला काळया यादीत टाका 

या योजनेअंतर्गत राबविण्यामत येत असलेल्या कामांसंदर्भात आढावा घेण्यासाठी महावितरणच्या अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात तीनदा बैठका घेण्यात आल्या. आर.डी.एस.एस.या योजनेसाठी केंद्र सरकारमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून ही कामे वेळेत पुर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. ही कामे वितरीत करण्यात आलेल्या एन.सी. सी. इन्फ्रास्टक्चर या कंपनीकडून अतिशय संथ गतीने  सुरू आहे. महावितरणकडून समज देण्यात येऊनही कामे पुर्ण होत नसल्याबद्दल खासदार लंके यांनी यावेळी नाराजी व्यक्त करताना या एजन्सीला काळया यादीत टाकण्याची आग्रही मागणी खा. लंके यांनी केली.

No comments