adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रदूषण मुक्त हरित क्रांती दिवस चोपड्यात उत्साहात साजरा

  प्रदूषण मुक्त हरित क्रांती दिवस चोपड्यात उत्साहात साजरा  चोपडा ( प्रतिनिधी) (संपादक-:- हेमकांत गायकवाड)   शहरातील सचिन ऑटो गॅरेज येथे प्रद...

 प्रदूषण मुक्त हरित क्रांती दिवस चोपड्यात उत्साहात साजरा 


चोपडा ( प्रतिनिधी)

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

 शहरातील सचिन ऑटो गॅरेज येथे प्रदूषण मुक्त हरित क्रांती दिवस उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या दिवसाची सुरुवात फित कापून करण्यात आले. 

ऑटो इन्स्टिट्यूट द्वारा आयोजित या कार्यक्रमास अनेक वाहनधारक मालक चालक व सर्विस सेंटर चे डीलर उपस्थित होते. वाहनांच्या माध्यमातून दूर कमी करून प्रदूषण रोखणे हा यावरील उपाय होऊ शकतो. म्हणून ऑटो चालकांनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. सर्व ऑटो गॅरेज मालकांनी हा कार्यक्रम सामूहिकरीत्या एकत्रितपणे राबवला आणि ६फेब्रुवारी हा दिवस" ग्रीन सर्विस डे"म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. चोपडे शहरातील पंकज नगर स्टॉप येथे सचिन पाटील यांच्या गॅरेजवर त्यांचे पिताश्री सुभाष रामदास पाटील यांनी फीत कापून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ऑटो इन्स्टिट्यूट चे संचालक डॉक्टर पाटणवाला, संचालक , जहागीरदार, सहयोगी संचालक युसुफ डी, व ऑफिसर किरण आचार्य यावेळी उपस्थित होते. चोपडे शहरातील दुचाकी वाहनधारकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

No comments