adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुदृढ निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता साफसफाई महत्त्वाची -सपोनि विशाल पाटील

  सुदृढ निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता  साफसफाई महत्त्वाची :-सपोनि विशाल पाटील  रावेर तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 सुदृढ निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता  साफसफाई महत्त्वाची :-सपोनि विशाल पाटील 


रावेर तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सावदा पोलीस स्टेशनची ७ कलमी कार्यक्रमांतर्गत स्वच्छता अभियान पोलीस स्थानकासह परिसरात राबविली साफसफाई मोहीम  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या १०० दिवसांचा ७ कलमी कार्यक्रम अंतर्गत जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक मा.डॉ. महेश्वर रेड्डी, यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गर्जे यांच्या समवेत पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी हे दर शुक्रवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत पोलीस स्टेशनचा परिसर श्रमदान करून स्वच्छ करीत आहेत. 


       तसेच सावदा पोलीस स्टेशन च्या वतीने सपोनि विशाल पाटील यांनी सावदा शहर वासियाना आपला परिसर स्वच्छ ठेवणे स्वच्छता राखणे शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर या संकल्पना राबविण्यात  प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे.आपले घर सभोवतालचे  परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणच स्वीकारावी मी स्वतः सभोवतालचे परिसरात अथवा इतरत्र कचरा करणार नाही आणि इतरांनाही करु देणार नाही असा संकल्प  संकल्प  आणि जनजागृती प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून अंगिकारावी जेणेकरून  सुदृढ निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ शहर व स्वच्छता महत्त्वाचे मोलाचे कार्य ठरेल असे आवाहन त्यांनी केले



No comments