पोलीस पाटील व गोरक्षकांना मारहाण:संशयतांच्या अटक करण्यासाठी वाघोदा येथे रस्ता रोको मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा प...
पोलीस पाटील व गोरक्षकांना मारहाण:संशयतांच्या अटक करण्यासाठी वाघोदा येथे रस्ता रोको
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघोदा बुद्रुक गावात गोरक्षकांना मारहाण केल्याचे वृत्त समोर येत आहे.या घटनेत पोलीस पाटील देखील मारहाण करण्यात आल्याचे समजते. यातील हल्लेखोर संशयीतांना जेरबंद करण्यासाठी बुऱ्हानपूर- अंकलेश्वर महामार्गावर हिंदुत्ववादी संघटनेतर्फे रस्ता रोको आंदोलन पुकारले असता या मार्गावर आंदोलन जवळपास एक तासा पर्यंत सुरू होता.
या घटनेमुळे वाघोदा व चिनावल गावात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे.
निंभोरा बु.गावाकडून वाघोदा मार्गे चिनावल गावाकडे अवैध गो वंश वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता याउलट गोरक्षक व वाघोदा बुद्रुक येथील पोलीस पाटील गणेश भोसले यांना दुसऱ्या गटातील चिनावल व वाघोदा येथील काही तरुणांनी मारहाण केली आहे.तरी वाघोदा व चिनावल येथील संतप्त गोरक्षकांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग दुपारी एक वाजेपासून ठप्प केला आहे.
आंदोलना स्थळी भेट देऊन संत महात्म्यांनी दिले निवेदन
वाहनात गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहितीवरून गोवंशाची सुटका करण्याकरिता सदर वाहनाला गोरक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता मोठा वाघोद्यातील काही समाजकंटकन या गोवंश असलेल्या वाहनाचालकास अभय देत गोरक्षकांवर तुफान दगडफेक करून त्यांना मारहाण केली.या घटनेच्या निषेधार्थ व हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी.म्हणून सावदा,चिनावल,वाघोदा येथील नागरिकांनी सदर ठिकाणी रस्ता रोको आंदोलन पुरले.तसेच या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज,ह.भ.प.धनराज महाराज,अंजाळेकर हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष,माहाराज,खंडेराव देवस्थानाचे महामंडलेश्वर पवन दाजी महाराज,योगेश भंगाळे, पंकज नारखेडे राहुल पाटील संजय माळी मनीष बंगाडे योगेश बोरवली सुरेंद्र भावी स्वप्निल पवार सह हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी या परिसरात होणारी सतत वंशाची वाहतूक व कत्तल सुध्दा एका महिन्यात कायमची बंद व्हावी.अशी मागणी प्रशासनाकडे केली. अन्यथा सकल हिंदू समाजाला सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल असे आव्हान जनार्दन हरी जी महाराज यांनी केली.
दरम्यान सावदा पोलिस स्टेशनला आमदार अमोल जावळे,आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली पोलिस स्टेशन मार्फत संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.घटनास्थळी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग,सावदा स.पो.नि. विशाल पाटील,निभोरा स.पो.नि हरदास बोचरे, फैजपूर पोलीस स्टेशन चे स.पो.नि. रामेश्वर मोताळे,सावदा पोलीस स्टेशन पोलीस व परिसरातील पोलिसांनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होतें
यावेळी सावदा पोलीस स्टेशनला आमदार अमोल जावळे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेटी दिल्या योग्य ती कारवाई करण्याचे सांगितले
दरम्यान या प्रकरणी ४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी वाघोदा पोलीस पाटील गणेश भोसले यांचे तर्फे फिर्याद देण्याचे काम सुरू होते तर उशिरा पर्यन्त गोतस्करांना मदत करीत पळून जाण्यास मदत करणार्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
No comments