adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लाकडी दांड्याने मारहाण करून चाकूचा धाक दाखवत लुटमार करणारी कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

  लाकडी दांड्याने मारहाण करून  चाकूचा धाक दाखवत लुटमार करणारी कुख्यात दरोडेखोरांच्या  टोळीच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या  सचिन मोकळं अहिल्यान...

 लाकडी दांड्याने मारहाण करून  चाकूचा धाक दाखवत लुटमार करणारी कुख्यात दरोडेखोरांच्या  टोळीच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.28):- नगर तालुक्यातील शेंडी व वांजोळी येथील शेत वस्तीवरील दरोडे घालणाऱ्या  टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास जेरबंद करण्यात यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.24 फेब्रुवारी रोजी फिर्यादी श्री.अशोक लहानु कजबे (रा.शेंडी बायपास रोड, ता.अहिल्यानगर) हे त्यांचे कुटूंबियासह घरी झोपले असताना यातील अज्ञात 6 ते 7 आरोपीतांनी त्यांचे घराचा दरवाजा तोडून,त्यांचे वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करून,चाकुचा धाक दाखवून घरातील महिलांचे दागीने जबरीने चोरून नेले.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे मध्ये गु.र.नं. 109/2025 बीएनएस कलम 311 प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने पथक गुन्ह्यातील आरोपींचा आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केला असून तो सध्या त्याचा साथीदार विकी संजय काळे,रा.भोरवाडी, ता.अहिल्यानगर याचे घरी आहे.तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन पथक तयार करून मिळालेल्या बातमीनुसार भोरवाडी, ता.अहिल्यानगर येथे विकी संजय काळे याचे घरी जात असताना आरोपीतांना पथकाची चाहुल लागताच तीन संशयीत इसम भोरवाडी येथील डोंगराच्या दिशेने पळून जाऊ लागले. पोलीस पथकातील तीन टीमने त्यांचा पाठलाग केला संशयीत इसमांना पोलीस पथकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.पथकाने तीन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी 1) तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले, वय 27, रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर 2) विकी संजय काळे, वय 18, रा.भोरवाडी, ता.अहिल्यानगर 3) सुशांत सुरेश भोसले, वय 19, रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.ताब्यातील आरोपीकडे गुन्हयांच्या अनुषंगाने विचारपुस त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार 4) अविनाश उर्फ खुडया सावत्या भोसले (फरार) 5) रमेश उर्फ रम्या सावत्या भोसले (फरार) दोन्ही रा.पिंपळगाव कौडा, ता.अहिल्यानगर 6) अभिजीत किरण भोसले (फरार) 7) तपेश किरण भोसले (फरार) 8) वैभव किरण भोसले (फरार) अ.क्र.6 ते 8 रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड अशांनी मिळून 4 दिवसापुर्वी शेंडी, ता.अहिल्यानगर येथे रात्रीचे वेळी डोंगराचे बाजुला एका वस्तीवर मारहाण करून चोरी केल्याचे सांगीतले.पथकाने ताब्यातील इसमांना गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपी विकी संजय काळे यांना त्याचे ओळखीचा सोनार विनोद लक्ष्मण बुऱ्हाडे, रा.बुऱ्हानगर, ता.अहिल्यानगर यास विक्री केलेबाबत माहिती सांगीतली. पंचासमक्ष सोनार यांनी आरोपीकडून घेतलेले एकुण 2,58,000/- रूपये किंमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोने हजर केल्याने ते जप्त करण्यात आले आहेत.पथकाने ताब्यातील आरोपीकडे अधिक विश्वासात घेऊन आणखी इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस करता तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले याने त्याचे वर नमूद साथीदारासह 10 ते 11 दिवसापुर्वी वांजोळी शिवार, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर येथे रात्रीच्या वेळी एका वस्तीवर दरोडा टाकुन मारहाण करून चोरी केली असल्याची माहिती सांगीतली.आरोपीने सांगीतलेल्या माहितीची पडताळणी करून सोनई पोलीस स्टेशनचा खालीलप्रमाणे दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,विश्वास बेरड, बापुसाहेब फोलाणे,हृदय घोडके, गणेश भिंगारदे,संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे,संदीप दरंदले, राहुल सोळुंके,पंकज व्यवहारे, सोमनाथ झांबरे,शाहीद शेख, गणेश धोत्रे,अशोक लिपणे, विजय ठोंबरे,किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ,बाळासाहेब खेडकर,विशाल तनपुरे, रविंद्र घुंगासे,जालींदर माने,आकाश काळे,भाऊसाहेब काळे,रोहित येमुल,अमोल कोतकर,रोहित मिसाळ,अमृत आढाव,मनोज लातुरकर,सुनिल मालनकर, रमिजराजा आत्तार,भगवान थोरात,उमाकांत गावडे,महादेव भांड,चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.

No comments