adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काॅंग्रेसमुक्त नव्हे तर, शोषणमुक्त भारत देश घडवू या !

  काॅंग्रेसमुक्त नव्हे तर, शोषणमुक्त भारत देश घडवू या !         जगाच्या पाठीवर भारतीय लोक सतत  संघर्षाच्या लाटा अंगावर घेऊन पुढे वाटचाल करी...

 काॅंग्रेसमुक्त नव्हे तर, शोषणमुक्त भारत देश घडवू या !     


  

जगाच्या पाठीवर भारतीय लोक सतत  संघर्षाच्या लाटा अंगावर घेऊन पुढे वाटचाल करीत आहे.  नाव सतत डगमळत असताना, आता ती  स्थिर पाण्याचे प्रवाहात  पुढील प्रवासासाठी सोडण्याची गरज निर्माण झाली?  भारत देश अनेक संकटांना तोंड देऊन, महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहत आहे.  भारताची प्रगती भांडवल निर्मितीतून  जरी होत असेल तरी ती एका कष्टाळू वर्गाच्या शोषणातून होत आहे, याचा सुद्धा विचार करावा लागेल ? आणि भारत देश जर महाशक्ती होत असेल?,  तर तो सुद्धा कोणाचे तरी रक्त आटवून होत आहे , हे सुद्धा नाकारता येणार नाही ?.  परकीयांच्या तावडीतून भारत देश स्वतंत्र होण्यासाठी काँग्रेस राजवट तयार झाली. स्वतंत्र झालेल्या भारत देशात २६ जानेवारी १९५० ला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने गाजावाजा सुरू झाला. 

                           पुढील काळात त्याच काँग्रेस पक्षाने पहिल्या घटना दुरुस्तीतून १८ जून १९५१ ला कष्टकरी वर्गांच्या शोषणातून भारताच्या प्रगतीची वाटचाल सुरू केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दुटप्पी धोरणाने आज पुन्हा देशावर  गंडांतर आले. आज भाजपचे सरकार काँग्रेस मुक्त भारत , नारा देत आहे., हा नारा सुद्धा अतिशय स्वार्थातून तयार झालेला दिसतो आहे. कालमानानुसार देशाच्या प्रगतीसाठी  प्रत्येक राजवटीत एक - एक चळवळ उभी होत असते. काँग्रेस राजवटीत स्वातंत्र्याची चळवळ उभी झाली. काँग्रेस  राजवटीनंतर , हिंदू धर्माची व  हिंदूराष्ट्राची चळवळ उभी करण्यात आर.एस.एस. ला व  भाजपाची वाटचाल असल्याचे दिसत आहे? खरे तर भारताच्या पृष्ठभूमीवर आर्थिक स्वातंत्र्याची चळवळ उभी करून, देश पातळीवर केंद्रातील कायदे व आर्थिक धोरणे बदलविण्याची गरज  निर्माण झाली. याकडे मात्र केंद्र सरकारचे सतत दुर्लक्ष आहे ? आणि आता तर भारत देशासाठी  आर्थिक स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याची वेळ येऊन ठेपली.  भारतीय युवा शक्तीची ती गरज तयार झाली.   स्वातंत्र्या नंतरचे  काळात गेल्या ७५ वर्षात, जर ७५ वेळा घटनादुरुस्ती करून बदल केला असेल , तर याचा अर्थ असा की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूळ संविधान तयार केले होते, ते आता कुठेच जागेवर राहिले नसेल, असे आता सामान्य जनतेला वाटत आहे ? म्हणजेच  जनतेला हा प्रश्न सुद्धा आता गांभीर्याने घ्यावा लागेल ? स्वातंत्र्या नंतर काळे इंग्रज हाकलले आणि आता तर  समाजवादी व्यवस्थेतून  गोरे इंग्रज, म्हणजे स्वकीय विरोधकच तयार झालेत . 

                                सत्तेतून पैसा व पैशाचा वापराने लोकांची मानसिकता बिघडविणे हा भ्रष्टाचारी मार्गाने प्रचंड बोफोर्स वाढवीला गेला . राजकीय पक्षांनी स्वतःच्या हितासाठी, तोडफोड करून ,स्वतःसाठी  कायदे तयार केले. सामान्य माणसांनी ज्या पक्षाला, किंवा  ज्या व्यक्तीला मतदान केले असेल, तो व्यक्ती दुसऱ्याच पक्षात जाऊन बसतो. हा तर मतदाराचा घोर अपमान होत आहे. या शोषणाच्या लुटमारीतूनच सत्तेच्या चाव्या, हातात येण्यासाठी , सत्ताधीशांनी व राज्यकर्त्यांनी जातीचे समीकरणे मांडली व जातीच्या समीकरणातूनच धर्मवाद तयार झाला. आणि तो धर्मवाद जवळपास सर्वच धर्मवाद्यांनी जोपासला. आणि त्याला राजनीतीचे प्राधान्य देऊन अमलात आणला. सत्तेच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी हिंदूच्या नावावर शिवाजी महाराज  लोकांच्या डोळ्यासमोर आणला ? प्रत्येक जाती-धर्माच्या मंडळींनी आपापला थोर पुरुष व संत महात्म्याचे  नाव घेऊन आपली वैयक्तिक राजकीय दुकानदारी वाढविली.  कुठे तर  सत्तेतून तिजोरी लुटण्यासाठी, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेचा खेळ चालू झाला. सर्वात मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला तो,  हिंदूराष्ट्राच्या निर्मितीवर  शोषित जनतेचे पोट भरनार आहे कां ? शोषित जनतेचे  प्रपंच जातीच्या व धर्माच्या नावावर चालत असेल ?  तर याचे उत्तरच हिंदूराष्ट्रवाद्यानी द्यावें ? 

                                 ग्रामीण भागातील लोक जीवन जगत असताना बारा बलुतेदार पद्धत ही पारंपरिक होती. तर ती धर्मवादाला धरून नव्हती तर ती अर्थवादी व्यवस्था होती.  बारा बलुतेदार पद्धतीत प्रत्येकांचे व्यवसाय वेग- वेगळे होते. आणि त्या व्यवसायातून देवाण-घेवांन होत असे . त्याही अगोदरच्या  प्राचीन काळात धान्याची कोठारे लुटण्या साठी दरोडे पडायची  व त्याच दरोड्यातून सरदार तयार झाले.  आता स्वातंत्र्यानंतर  जनतेच्या कष्टाच्या पैशातून तिजोरी लुटण्यासाठी आमदार- खासदार तयार झाले.? याच शासन चोरांच्या  सभेला  मोठं - मोठी गर्दी व्हायला लागली. आणि आजची जनता या चोरांच्या सभेला जाऊन त्यांचेच पाठीराखे झाले? आणि हेच लुटारू परिवर्तनाची भाषा करायला लागले आणि देश लुटायला लागले. आणि वेगवेगळी आम्मिषे देवून यांच्या भूल थापांना, समाज बळी पडत चालला. निवडणुकीचे  काळातील जाहीरनामा, वचननामा हे धुळखात पडले आहेत. हे फक्त बोलाची भात आणि बोलाची कढी तयार झाली. सत्तेच्या बळावर पंजाब, हरियाणा, दिल्लीच्या तक्तावर, नुसता शेतकरी वर्ग  नामोहरम करणे चालू झाले. साम-दाम- दंड-भेद वापरून शेतकऱ्यांचा आवाज दाबता येईल, तेवढा दाबण्याचा प्रयत्न सुरू झाले. म्हणजे शेतकऱ्यांनी आवाज उठवू नये, यांनी  गुलामगिरीत व लाचारीत जगावे ही आजची लोकशाही सांगत आहे,ती फक्त लोकशाहीच्या नावावर दडपशाही चालू आहे .

                                           आपण कोठून निघालो , कशासाठी निघालो होतो ?  व  आता कोठे जाऊन फसलो ? , याचे चिंतन व मननं आता मतदारांना करावें लागेल? , शोषणाची व्यवस्था ही केंद्राच्या धोरणात फस लेली आहे. कारण पुढील व्यवस्था ही सर्व मतदानाच्या प्रक्रियेतून राबविल्या जात आहे, आणि ती तर आता ई.व्हीं.एम.मशीन मधून घडविल्या जात आहे. कोणत्याही मशीनचे चालक व दुरुस्ती करणारे हे मेकॅनिकल असतात. व त्या मशीन मध्ये खोडतोड करणे, दुरुस्ती करणे हा आता भ्रष्टाचारी व्यवस्थेचा भाग बनला आहे? मानवनिर्मित मशीन ही सदोष की निर्दोष हा पुन्हा,  पूनर्वीचार करावा लागेल? निवडणूक आयोग हे सुद्धा राजकीयांचे बाहुले  तयार झाले ? ही परिणीती व व्यवस्था बदलण्याची जबाबदारी आता समाजावर येऊन ठेपली ?

स्वातंत्र्याच्या अगोदर देशप्रिय व्यवस्था होती. देशप्रिय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लाखो लोकांनी , आपल्या प्रपंचाची आहुती दिली. परकीयांच्या, इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र करण्यासाठी, भगतसिंग , सुखदेव , चंद्रशेखर फासावर चढले. भारतीयांनी आपल्या जीवनाच्या राख रांगोळी केल्या? नंतर  सत्तेच्या लालची पोटी  शेतकरी- शेतमजुराच्या शोषणातून, औद्योगीकरण वाढविण्याची प्रक्रिया तयार झाली. ग्रामीण वाटचालीला पुढे न नेता शहरीकरणाची भरमसाठ वाढ केली . तिथेच देश पातळीवर अर्थवाद घाईस आला. समाजवादी व्यवस्थेतून आज धर्मवाद तयार झाला ,आणि तो हिंदू राष्ट्राच्या नावाने वाढला. काँग्रेस व बीजेपी हे दोन्ही शेतकर्यांचे  विरोधी पक्ष भांडवलशाहीला जोपासणारे आहेत. आणि या दोन्ही पक्षाने शेतकऱ्यांचा आर्थिक वाद समूळ नष्ट केला, हे आता सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांचा राजकीय पक्ष या देशात उभा होऊ नये हीच काँग्रेस व बीजेपी या दोन्ही पक्षांनी आखलेली खून गाठ आहे. म्हणजेच भांडवलशाहीच्या कचाट्यातून शेतकरी- शेतमजुरांचे शोषण हे अजून थांबणार नाही तर, ते सतत वाढणार आहे?. नुकत्याच झालेल्या, हरियाणा, महाराष्ट्र व दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हिंदूंच्या नावावर मते मागून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भाजपाचे पितळ उघडे पडले आहे. काँग्रेस व बीजेपी या व्यतिरिक्त तिसरा शेतकरी पक्ष भारतीय पातळीवर उभा होऊ नये व त्यास राष्ट्रीय मान्यता मिळू नये यासाठी या दोन्ही पक्षाचे आटोकाट प्रयत्न चालू आहे. शेतकरी विचारधारा संपवून मंदिरे उभारून लूटमार चालू झाली. 

             दिल्लीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वर भ्रष्टाचारी आरोप बीजेपी ने केलेत, त्यांना कैदेत सुध्दा डांबले. ? तेलंगणामध्ये के. कविता, तसेच हेमंत सोरेन झारखंड यांच्यावर सुद्धा अनेक भ्रष्टाचारी आरोप झालेत .  याचा अर्थ संपूर्ण भारतात बीजेपी व त्यांचे आमदार- खासदार, मंत्र्यां नी ,भ्रष्टाचार केला नाही असा होतो काय ? महाराष्ट्रात सर्व भ्रष्टाचारी पाठीशी घालून सत्तेत येण्याचे कट कारस्थान हे तर भाजपानेच केले? जे स्वतः  भ्रष्टाचारा च्या गटांगळात फसले आहे, त्यांनी इतरांवर आरोप करणे हे अतिशय गैर आहे ? याचाच अर्थ भाजपाच्या पक्षासी युती करणे व त्यात सामील होणे म्हणजे या देशातील सर्व भ्रष्टाचारी शुद्ध होणे. व कलंकित भ्रष्टाचारांना पाठीशी घालून कुंभमेळ्याचे गंगास्नान घालून त्यांना निर्दोष दाखविण्याचे स्वप्न भाजपा जनतेला दाखवीत आहे काय?. आज पक्षांमध्ये जमा झालेला फंड असेल तर तो भाजपाचा इतर राजकीयपक्षाचे तुलनेत  सर्वात जास्त असलेला फंड जमा आहे . ज्या काँग्रेसने साठ वर्षे सत्तेत घालविले त्याहीपेक्षा संपूर्ण देशात भा.ज . पा ने माया जमा केली. गेली पंधरा वर्षात भाजपाचे आमदार- खासदारांचे उत्पन्न चौपटीवर गेले. मग सत्तेचे लुटारू कोण आहेत ?  महाराष्ट्रात विधानसभा  निवडणुकीच्या काळात वेळेवर लाडकी बहीण योजना लागू करून मतदानासाठी  अधिकृत पैसे महिलांच्या खात्यावर जमा करणे हा तर अधिकृत शासकीय भ्रष्टाचार महाराष्ट्रातील जनतेला दिसला.?  विधानसभा महाराष्ट्राच्या २०२४ निवडणुकीत सर्वात जास्त सोने, पैसा  निवडणुकीत भरारी पथकांनी पकडून जप्त केला व तू पुन्हा शासन तिजोरीत जमा झाला. म्हणजेच भारतातील महाराष्ट्र हे किती भ्रष्टाचारी राज्य आहे हे सिद्ध झाले. म्हणजेच निवडणुकीच्या अगोदर सुद्धा भाजपाचे सरकार, महाराष्ट्रात होते व नंतरही भाजपाचे सरकार सत्तेवर आले? म्हणजेच याचा अर्थ " सत्तेपुढे शहाणपण चालत नाही "  हे निर्वीवाद सत्य आहे.?

                      महात्मा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यानंतर शरद जोशी यांनी शेतकरी शेतमजुरांच्या आर्थिक शोषनावर, देश पातळीवर अर्थवाद मांडला.भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणामुळे  देश महासत्तेच्या नावावर धर्मसत्तेकडे प्रस्थापित झाला, व आता हिंदूराष्ट्र निर्मितीकडे  वाटचाल करीत आहे. महान तत्ववेत्यांचा अर्थवाद इथेच संपला. अर्थवाद संपवून धर्मवांद चालविण्याची कृती भारतभर चालू झाली. आज भारताने धर्मवाद जिंकला, अर्थातच अर्थवाद हरला ? पुन्हा अर्थवाद चालू होण्यासाठी, राबवि ण्यासाठी व भारताला पुनर महासत्ता बनविण्यासाठी आर्थिक धोरणाची वाटचाल करावी लागेल. अर्थवाद पुन्हा आपण उभा करू या? काँग्रेस मुक्त भारत ही गाढव कल्पना  फक्त राजकीय अपेक्षेने धर्मवादाच्या नावावर समाजात रूढ झाली,  आणि  " शोषण मुक्त भारत " ही कल्पना मात्र वाऱ्यावर टांगल्या गेली ?.  इथेच भारत देशाच्या महानतेची हानी झाली ? 

                    आता पुन्हा " शेतकरी- वारकरी, कष्टकरी महासंघाच्या " वतीने शोषण मुक्त भारत घडवू या !  काँग्रेसमुक्त नव्हे तर, शोषण मुक्त भारत घडवू या ! समाजवादी व्यवस्थेतून धर्मवाद तयार झाला, व पुढे धर्मवादातून आता अर्थवादि धोरणाची कास धरू या ! 

पुन्हा आम्ही सारे भारतीय, एकत्र होऊन लढू या !

 धर्मवाद हद्दपार करूया ! 

 " जिंकू अथवा मरू " ,भारत देश शोषणमुक्त करू ?

              पुन्हा आर्थिक स्वातंत्र्यासाठी आता  पेटवा मशाली ? आता उठवू सारे रान......

             " शोषण मुक्त भारत देश घडवू या ! " 

                जय हिंद .          जय भारत.

                जय जवान.        जय किसान.

आपला नम्र :-  संदीप आधार पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना             मो. ९७६६१२५५८४



No comments