बाभुळगाव जि. प. विद्यालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी. विकास पाटील :- धरणगाव (संपादक-:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : अखंड हिंदुस्तानाचे आराध्...
बाभुळगाव जि. प. विद्यालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
विकास पाटील :- धरणगाव
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्राचे इतर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी होत असते. अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेली राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील जि. प. विद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नाट्य सादर करून विविध गीत सादर केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील व मॅडम हर्षा नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या इतिहास थोडक्यात सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जीवनात कठीण प्रसंगातही कधी खचले नाहीत, तर अनेक मोठमोठे अडचणी वर मात करून महाराजांनी यश मिळवले. म्हणूनच आज ना भूतो ना भविष्यती असा राजा पुन्हा जन्मास नाही अशी कीर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्यामुळे आज त्यांच्या दोन-दोन जयंती या साजरा होत असतात. असे उद्गार शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील यांनी काढले.

No comments