adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

देशातील जवळजवळ १० कोटी शेतकऱ्यांना रु.२२००० कोटी च्या १९ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात हस्तांतरण

देशातील जवळजवळ १० कोटी शेतकऱ्यांना रु.२२००० कोटी च्या १९ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात हस्तांतरण  कृषी विज्ञान केंद्र,पाल (रावेर) येथे आयो...

देशातील जवळजवळ १० कोटी शेतकऱ्यांना रु.२२००० कोटी च्या १९ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात हस्तांतरण 


कृषी विज्ञान केंद्र,पाल (रावेर) येथे आयोजीत कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित...


सतिश गायकवाड कार्यकारी संपादक मुक्ताईनगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

भागलपूर (बिहार) येथे “किसान सन्मान समारोह” कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जनकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद आणि “किसान सम्मान निधी” १० कोटी शेतकऱ्यांना २२ हजार कोटी निधी हस्तांतरित; कृषी विज्ञान केंद्र,पाल (रावेर) येथे आयोजीत कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित...


भागलपूर (बिहार) येथे “किसान सन्मान समारोह” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मोदी सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” अंतर्गत देशातील जवळजवळ १० कोटी शेतकऱ्यांना रु.२२००० कोटी च्या १९ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात हस्तांतरण करून १०००० किसान उत्पादन संघटन देशाला समर्पित केले व मोतीहारी येथे उत्कृष्टता केंद्र व बरौनी येथे दुध उत्पाद सयंत्राचे उद्घाटन केले.तसेच ५७० कोटी निधीच्या वारीसलीगंज-नवादा-तिलैय्या रेल्वे रूळ खंड दुहेरीकरण आणि इस्लामपूर-रफिगंज रोड ओव्हरब्रीज जनतेला समर्पित केला. 


सदर कार्यक्रमाचे जळगांव जिल्हा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र पाल (रावेर) येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित राहून उपस्थित शेतकरी व आदिवासी भागातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचे आदिवासी भागातील लाभार्थी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.



No comments