adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या मोरनदीत ट्रॅक्टरने वाळू वाहतूक महसूल विभागाचे दुर्लक्ष

  फैजपूरच्या मोरनदीत ट्रॅक्टरने वाळू वाहतूक  महसूल विभागाचे दुर्लक्ष इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील मधुकर सहका...

 फैजपूरच्या मोरनदीत ट्रॅक्टरने वाळू वाहतूक  महसूल विभागाचे दुर्लक्ष


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना जवळील मोर नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक ट्रॅक्टर द्वारे भर दिवसा वाळू माफिया उपसा ढीग साठा करून मध्यरात्री वाहतूक करीत आहे मात्र महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत अशा तक्रारी वाढल्या आहेत      

फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना जवळील लगत मोठी मोर नदी असून या नदीतून वाळू उपसा करणारे दिवसा मोठमोठे ढीग जमा करून नंतर बहुतेक ट्रॅक्टर द्वारे फैजपूर व अन्य आजूबाजूच्या परिसरात मध्यरात्री वाहतूक करीत आहे या मोर नदीतून दररोज वाळू खोदाई करून काढले जात असल्याने नदीची पातळी दिवसेंदिवस खोलवर होत आहे तरी महसूल विभागाचे फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी साहेब आणि यावलच्या तहसीलदार मॅडम यांनी लक्ष देऊन वाळू माफियांविरुद्ध मोहीम राबवून गंभीर स्वरूपाची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे

No comments