फैजपूर परिसरात विमल गुटखा सर्रास विक्री व्यवसायातून लाखोंची उलाढाल कारवाईची मागणी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) फैजपूर...
फैजपूर परिसरात विमल गुटखा सर्रास विक्री व्यवसायातून लाखोंची उलाढाल कारवाईची मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूरसह परिसरात विमल गुटखा सुगंधीत तंबाखू शहरात पान मसालाच्या टपऱ्यांवर आणि दुकानांमध्ये सर्रास खुलेआम कोणालाही न घाबरता विक्री केली जात असून विमल गुटखा व्यावसायिक हे मध्यप्रदेश येथून आणून विक्री करीत आहेत या व्यवसायातून विक्री करणाऱ्या व्यावसायिक लाखो रुपयांची उलाढाल करीत आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की फैजपूर शहरात व परिसरात विमल गुटखा खुलेआम कोणालाही न घाबरता राजरोजपणे पान टपरीधारक व दुकानांमध्ये सर्रास विक्री केली जात आहे फैजपूरात काही होलसेल व्यावसायिक मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून आणून शहरात व परिसरात पुरवण्याचे उद्योग करीत आहे या विक्री व्यवसायातून रोजची लाखों रुपयाची उलाढाल होत आहे अन्न भेसळ विभाग अधिकाऱ्यांनी व फैजपूर पोलिसांनी गंभीर स्वरूपाची दखल घेऊन धाडसत्र मोहीम राबवून सक्त कारवाई करावी अशी मागणी फैजपूर व परिसरातून सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
No comments