adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रोजगार हमी योजेने अंतर्गत मंजूराची मजूरी रखडली विकास कामांना लागला ब्रेक

  रोजगार हमी योजेने अंतर्गत मंजूराची मजूरी रखडली विकास कामांना लागला ब्रेक भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी :- (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  राष्ट...

 रोजगार हमी योजेने अंतर्गत मंजूराची मजूरी रखडली

विकास कामांना लागला ब्रेक


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी :-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 राष्ट्रीय रोजगार हमी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असली तरी मजुरांना कामाचा मोबदला मिळत नसल्याने या योजनेबाबत मजुरांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, शबरी, रमाई आवास योजनेंतर्गत व शाळेतील वॉल कंपाऊंड , गोठ्याच्या कामे झाली असून नीधी अभावी पेमंट मिळत नसल्यामुळे मजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऑगष्ट पासून आतापर्यंत केलेल्या कामाच्या मजुरीची रक्कम मिळाली नाही. याबाबत शासनस्तरावर कमालीची उदासीनता दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर थांबावे व हाताला काम देण्याबरोबरच या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभ देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जातात. मात्र, काम करूनही मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा न झाल्याने मजूर बँकेत व पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून थकले आहेत.

रोजगार हमी योजनेतून केंद्र सरकारच्या वतीने नोंदणीकृत मजुरांना १०० दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत यंत्रणा स्तरावर ५० टक्के आणि ग्रामपंचायत स्तरावर ५० टक्के कामे केली जातात. यात कायद्यान्वये कुशल कामे ४० टक्के तर अकुशल कामाचे प्रमाण ६० टक्के ठेवणे आवश्यक आहे. रोहयोअंतर्गत जनावरांचे गोठे, फळबाग, शेळी शेड, कुक्कुटपालन शेड, शेततळे, नाडेप खत, गांडूळ खत, वैयक्तिक शौचालय, नवीन सिंचन विहीर अशा १४ प्रकारच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.

का? रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची १५ दिवसांच्या आता त्यांच्या मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. तसा रोहयो'चा नियम आहे. खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाल्यास विलंब शुल्क अर्थात व्याजानुसार मजुरीची रक्कम अदा केली जाते. विलंबासाठी जबाबदार असलेल्यांकडून ही रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे मात्र चाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे

No comments