गुरांच्या गोठ्यात अचानक आग लागून लाखांचे नुकसान भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड ) तालुक्यातील परसाळे गावात जिल्हा ...
गुरांच्या गोठ्यात अचानक आग लागून लाखांचे नुकसान
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड )
तालुक्यातील परसाळे गावात जिल्हा परिषद शाळेच्या समोर असलेल्या गुरांच्या गोठ्यात अचानक आग लागून अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले मात्र पंचनामा करताना तलाठी यांनी दीड लाखाची नोंद केल्यामुळे नुकसान ग्रस्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गुरांचे गोठ्यात २० रोजी सकाळी ११.४० वाजेचे सुमारास अचानक आग लागली. आगीत ८० हजार रुपये किमतीची बैलजोडी जळाली यात एक बैल जागीच ठार झाला तर दुसरा चाळीस ते पन्नास टक्के जळाला असून त्याचेवर वैद्यकीय उपचार सुरू आहे. आगीत गुरांचा चारा पत्रांचे शेड मटेरियल ६० ते ७० हजार रुपये, शेती उपयोगी अवजारे असे साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच युनूस तडवी यांनी तत्काळ अग्निशामक दलाच्या गाडीला भ्रमणध्वनीद्वारे कळिवले. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यास मदत झाली. घटनास्थळी तलाठी पुरुषा तडवी यांनी घटनेचा पंचनामा करताना फक्त दीड लाख रुपये नुकसानीची नोंद केली.
No comments