आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लासुर सत्रासेन चौगाव परिसरात १ कोटी ८८ लाख २५ हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न प्रतिनिधी. रविंद...
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लासुर सत्रासेन चौगाव परिसरात १ कोटी ८८ लाख २५ हजार रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
प्रतिनिधी. रविंद्र कोळी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज रोजी चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत लासूर,सत्रासेन,चौगाव ,उत्तमनगर या गावांमध्ये वनतडे बांधणे,सिमेंट नाला बांधणे,नाक्यावर शेड बांधणे,स्मशानभूमी बांधकाम करणे,आरोग्य केंद्रची दुरुस्ती करणे,रस्ता खडीकरण करणे,मचान बांधणे,माहिती फलक बेंचेस बसवणे,पॅगोडा बांधणे संरक्षण करणे बनवणे,अशा प्रकारच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न झाले त्याप्रसंगी तालुक्यातील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आदिवासी भागात कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली व त्याप्रसंगी आदिवासी करिता विविध योजनांची माहिती दिली त्याप्रसंगी सत्रासेन येथे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा सामूहिक सत्कार सोहळा संपन्न झाला प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील,पंचायत समिती,चोपडा माजी उपसभापती एम व्ही पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,ए.के.गंभीर तसेच वनविभागाचे प्रथमेश हाडपे,आर एफ ओ.बी के थोरात,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रावसाहेब पाटील,विजय पाटील,अनुप जैन,गणेश पाटील,कैलास बाविस्कर,रमेश बापू ठाकूर,राहुल पाटील लासुर,अन्नू ठाकूर,ज्ञानेश्वर राजपूत,उखा भिल,गौतम सोनवणे,बळीराम जोशी,भिकन राजपूत समस्त सत्रासेन शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

No comments