"जीएसटी" मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ बी पेरल्या पासून शेतमाला विक्री पर्यंत लागणाऱ्या विविध प्रकारच्या करांन मुळे शेतक...
"जीएसटी" मुळे उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार वाढ
बी पेरल्या पासून शेतमाला विक्री पर्यंत लागणाऱ्या विविध प्रकारच्या करांन मुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. खते, कीटकनाशके, अवजारांसह इतर गोष्टींवर ५% ते २८% पर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५००० रुपयांची वाढ झाल्याचे दिसते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही जीएसटी मुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याची कबुली दिली.
जीएसटी ची अशी होते आकारणी
ट्रॅक्टर स्पेअरपार्ट २२ ते २८%
किटकनाशके. १८%
तणनाशके. १८%
शेती पंम्प.१८%
शेती औजारे. १२ ते १८%
फवारणी पंप. १२ ते १८%
पीव्हीसी पाईप. १२ ते १८%
ठिबक साहित्य. १२%
सेंद्रिय खते. १२%
रासायनिक खते. ५%
डिझेल /पेट्रोल ५%
बियाणे. ५%
जीएसटी मुळे असा वाढला उत्पादन खर्च, हेक्टरी
रासायनिक खतांचा खर्च. ५० हजार + (५% जीएसटी) २५०० रुपये
कीटकनाशक व तणनाशक ३० हजार + (१८% जीएसटी) ५४०० रुपये
द्रव्य खते व टॉनिक. १० हजार+ (१८% जीएसटी) १८०० रुपये
पीव्हीसी पाइप, ट्रॅक्टर स्पेअर पार्ट, डिझेल आदी २२ हजार (१२ ते १८% जीएसटी) ४५०० रुपये मग शेतकऱ्यांना परतावा का नाही
व्यापाऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटीच्या परतावा शासनाकडून मिळतो पण शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या जीएसटी गंगाजळीला जमा होतो एक तर शेतकऱ्यांना जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढावे अन्यथा त्यांना परतावा द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील हे करत आहेत ‼️‼️‼️
उत्पादन खर्च कमी होऊन आधारभूत किंमत मिळाल्याशिवाय शेती कीफायातशिर होणे अशक्य आहे. शेती जीएसटी मुक्त करण्यासाठी आगामी काळात लढा उभा करावा लागणार आहे केंद्र सरकार एका बाजूला आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत असा आव आणतं आणि प्रत्यक्षातील व्यवहार मात्र शेतकऱ्यांना लुबाडणाराच आहेसंदीप पाटील
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना
No comments