adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साळवे क्लासच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांची १०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

  साळवे क्लासच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांची १०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी  सचिन मोकळं अहिल्यानगर ...

 साळवे क्लासच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांची १०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२८):-नागापूर येथील साळवे क्लासमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांची १०० वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी क्लासच्या संचालिका सौ.भारती संघर्ष साळवे यांनी विद्यार्थ्यांना दादासाहेब रुपवते यांनी केलेल्या सामाजिक,धार्मिक,राजकीय व शैक्षणिक कार्याची माहिती दिली.दामोदर तात्याबा रुपवते (२८ फेब्रुवारी १९२५ - २३ जुलै १९९९), सामान्यतः दादासाहेब रुपवते म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय राजकारणी,आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्राचे संपादक होते.सुरुवातीला ते शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले. दादासाहेब रुपवते हे मानवाधिकार नेते बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी होते.ते 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक-सदस्य होते.1968 ते 1978 या कालावधीत ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य होते.1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीत त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम पाहिले; आणि त्यांच्याकडे समाज कल्याण,गृहनिर्माण,सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय,झोपडपट्टी विकास हे विभाग होते.ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देखील होते.ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या 22 खंडांच्या मालिकेचे समिती सदस्य होते.ते साप्ताहिक "प्रबुद्ध भारत" आणि मराठी विश्वकोश,वाई (1962-1966) चे संपादक होते.ते "द रिपब्लिकन" (1960-1962) चे उप-संपादक होते.साप्ताहिक "साधना" ट्रस्टचे (1968 - 1978 आणि 1997 पासून) विश्वस्त होते.आंबेडकरांच्या दलित बौद्ध चळवळीपासून प्रेरित होऊन, रुपवते आणि त्यांच्या कुटुंबाने १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला.त्यांचा मुलगा प्रेमानंद रुपवते हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते तसेच अहिल्यानगर मधील  दादासाहेब रुपवते विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हे त्यांच्या नावावर आहे त्या विद्यालयातून आजही गोरगरीब विद्यार्थी शिकत असून त्यांनीही विद्यालयाचे नाव उंचावले आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे साळवे क्लासच्या संचालिका सौ.भारती संघर्ष साळवे म्हणाल्या.यावेळी  

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्यां सौ.सुप्रिया बोरा व सौ.अर्पिता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.दादासाहेब रुपवते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

No comments