कार्यालयात चक्क अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला. अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक-:- हेमकांत गायकवाड) मलकापूर न.प. हद्दीमध्ये ...
कार्यालयात चक्क अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर न.प. हद्दीमध्ये चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरस्थित शांती आरोग्यम् हॉस्पीलची बिल्डींग ही न.प.ची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आली असतांनाही न.प. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे सदर बांधकाम धारकास पाठीशी घालण्याचा प्रकार करीत आहेत. सदर दवाखान्याच्या अवैध बांधकामाबाबत तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी संबंधित बांधकाम धारकास सदरचे बांधकाम एक महिन्याच्या आत जमीनदोस्त करण्यात यावे, अन्यथा आपणा विरूध्द फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र दि.२७.१२.२०२४ रोजीच डॉ.विकेश जैन (शांती आरोग्यम् हॉस्पीटल) मलकापूर यांना दिले होते. या पत्राला दोन महिन्यांचा कालावधी उलटत असतांनाही कुठलीही कारवाई न.प. प्रशसानाकडून करण्यात येत नसल्याने येत्या ५ मार्च रोजी न.प. कार्यालयात गाढव आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी निवेदनाद्वारे दिला होता.
न.प. प्रशासन सदर अवैध दवाखाना बांधकाम धारकास केवळ पाठीशी घालण्याचे काम करीत असून एकीकडे प्रशासन संबंधित बांधकाम धारकास नोटीस बजावते तर दुसरीकडे प्रशासनातीलच अधिकारी, कर्मचारी हे वेळकाढू धोरण अवलंबित त्या अवैध बांधकाम धारकास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या न.प. प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह बलराम बावस्कार, अजित फुंदे यांनी २४ फेब्रुवारी रोजी चक्क न.प. कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करीत न.प. प्रशासना विरोधात निषेध नोंदविला. तसेच याबाबत लवकरात लवकर योग्य कार्यवाही न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
No comments