शिवराज बहुउद्देशीय विकास संस्थेचा उद्घाटन सोहळा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला विरार प्रतिनिधी -:- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विरा...
शिवराज बहुउद्देशीय विकास संस्थेचा उद्घाटन सोहळा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला
विरार प्रतिनिधी -:-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरार:- घर नसलेल्या व काही कारणास्तव माहेर तुटलेल्या कुठल्याही महिलेला माहेर मिळावं म्हणून शिवराज बहुउद्देशीय विकास संस्था हक्काचं माहेर ही संकल्पना राबवत आहे. त्यासाठी महिलांचं हक्काचे ठिकाण म्हणून हक्काच्या माहेरघराचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पार पडला. याच प्रसंगी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पल्लवी परुळेकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते रिबन कापून हक्काचं माहेर घराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी शिवराज बहुउद्देशी विकास संस्थेच्या अध्यक्ष खुशी अशोक कांबळे, सचिव मनीषा जाधव, उपाध्यक्ष सुमन देसाई, राज्य महिला समन्वयक शैला मानकर, संपर्कप्रमुख पुनम देसाई, पालघर जिल्हा अध्यक्ष शैलाताई परुळेकर, जिल्हा संपर्क प्रमुख वृषाली भावे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments