आदर्श माध्यमिक विद्यालय व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बक्षिस वितरण व दहावीच्या विद्यार्थांना निरोप... तुमचे स्वप...
आदर्श माध्यमिक विद्यालय व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बक्षिस वितरण व दहावीच्या विद्यार्थांना निरोप...
तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानरुपी पंखाचे बळ मिळो... अध्यक्ष सी.के.पाटील.
मूल्यवर्धित शिक्षणातून समाजाला नवीन आकार द्या.....प्राचार्या सुरेखा पाटील
विकास पाटील जळगाव
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
धरणगाव -- येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वआदर्श माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षिस वितरण व दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात उद्याच्या भविष्याची चाहुल स्पष्टपणे दिसून येत होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवास उलगडून दाखवला. त्यांनी केलेल्या खोड्या, मिळवलेलं यश, याबद्दल माहिती देऊन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या भावना विद्यार्थांनी त्यांच्या मनातील साचलेल्या सर्व बाबींना वाट मोकळी करून दिली. यामध्ये चैताली पाटील, वैशाली मराठे,कावेरी सोनवणे,राधिका महाजन, वैशाली चव्हाण,चैतन्य पाटील,दिव्या माळी, स्नेहा मनुरे आदींनी मनोगत व्यक्त करून भावनांना वाट मोकळी करून दिली. अनेकांना अश्रू अनावर झाले होते; काहींना शब्द सुचत नव्हते तर काहींनी एवढं प्रगल्भ भाषण केलं की एखाद्या तत्वज्ञानी व्यक्तीला देखील विचार करण्यास प्रवृत्त ठरेल. संस्थेचे चेअरमन सी.के.पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात"तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी या ज्ञानरुपी पंखांना बळ मिळो, तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत असे प्रतिपादन केले तर संस्थेच्या प्राचार्या प्रमुख पाहुण्या सुरेखा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून "मूल्यवर्धित शिक्षणातून समाजाला नवीन आकार द्या" भावी आयुष्याच्या खडतर प्रवासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. प्रा.व्ही.जी.पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील पर्यवेक्षक ए. एस.पाटील आदींनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थांनी अभ्यास कसा करावा, परीक्षेचे नियोजन कसे असावे, स्पर्धेला सामोरे कसे जावे, यशस्वी व्यक्ती यापेक्षा एक चांगला माणूस कसा व्हावा याबाबत सखोल मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्वांनी पोहे,मटकी उसळ जिलेबी मिष्टांनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थांनी परिश्रम घेतले.वर्षभरातुन घेतलेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी - विद्यार्थिनीना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षीका कविता पाटील यांनी मांनले.

No comments