adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वस्तीगृहात शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक झालो माजी विद्यार्थी धनराज राजपूत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

  वस्तीगृहात शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक झालो माजी विद्यार्थी धनराज राजपूत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न  भरत कोळी यावल ता.प्रतिनि...

 वस्तीगृहात शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक झालो माजी विद्यार्थी धनराज राजपूत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

चुंचाळे ता.यावल येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयाच्या सन२०००/२००१च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. मेळाव्यात एकूण ४५माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. धुळे येथे कार्यरत असलेले व्यावसायिक सूर्यभान पाटील वासुदेव बाबा केळी ग्रुप चे मालक विवेक पाटील, जळगाव ,भुसार मालाचे  व्यापारी डिंगबर पाटील,  स्टार इन्स्टिट्यूट चे मालक समाधान धनवाई ,  कोकणात कार्यरत पोस्ट ऑफिसचे अधिकारी युसुफ तडवी, व्यापारी सेलचे अध्यक्ष पूनमसिंग परदेशी  साकळी सब स्टेशनचे ऑपरेटर रमजान तडवी, यावल एसटी डेपो मधील कंडक्टर व ड्रायव्हर परशुराम पाटील, चंद्रपूर येथे कार्यरत सुनील मराठे, बोराळे येथील भरतसिंग राजपूत, सुरत हुन आलेले प्रवीण पाटील, शिरपूर येथील भागवत, पाळधी येथून भिमसिंग राजपूत ,राजू तडवी,इसा तडवी,बलवंत पाटील, तडवी  मराठे,गृहिणी सुवर्णा धनगर ,साधना धनगर, सुलभा लोहार ,छोटी सावकारे, आशा तडवी,सुरत येथे सरकारी दवाखान्यात कार्यरत असलेल्या कल्पना राजपूत यांनी आपल्या गावात शाळेची सुरुवात घरांमध्ये झाली व ती आज बहरली असा आनंद व्यक्त केला.श्री समर्थ सद्गुरु वासुदेव बाबांनी गावामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी सुरू केल्याने गोरगरबांचे पोरं शिक्षण घेत असल्याने आम्ही या पदावर जाऊ शकलो व आम्हाला हे व्यासपीठ मिळालं अशा भावना सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. वस्तीगृहातील समाधान धनवाई , भिमसिंग राजपूत व धनराज राजपूत आम्ही वस्तीगृहात राहून शाळेत शिक्षण घेतले व आज आम्ही कंपनीचा मालक असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

शिक्षकांमधून सुनील पाटील, सुधीर चौधरी,एस.बी गोसावी, एम.आर.चौधरी,प्रशांत सोनवणे, वाय.वाय. पाटील यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्ही जी तेली होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यभान पाटील  यांनी केले प्रास्ताविक विवेक पाटील,आभार प्रदर्शन पुनम राजपूत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील प्रगतीशील शेतकरी विनोद पाटील, दिगंबर पाटील, किशोर वानखेडे, रवींद्र पाटील,अमोल बोरसे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

No comments