adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्ह्यात अफूची शेती...लाखोंचा मुद्देमाल जप्त

  जिल्ह्यात अफूची शेती...लाखोंचा मुद्देमाल जप्त  अहिल्यानगर (दि.२६ प्रतिनिधी):- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेतात अफुच्या झाडाची बेकायदेशिर...

 जिल्ह्यात अफूची शेती...लाखोंचा मुद्देमाल जप्त 


अहिल्यानगर (दि.२६ प्रतिनिधी):-

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेतात अफुच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड करणा-या आरोपीस एकुण ११ लाख ४३,६००/-रुपये किंमतीच्या मुद्देमालासह पकडण्यात शेवगाव पोलीसांना मोठे यश आले आहे.महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफुच्या झाडाची बोधेगाव शिवारात ईसम नामे गणेश नवनाथ घोरतळे यांनी त्यांचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याच माहीती शेवगाव पोलीस ठाण्याचे पोनि.समाधान नागरे यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पंचासह सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता गणेश नवनाथ घोरतळे यांच्या मालकीची गट नं. ४५१ मध्ये अंदाजे चार गुंठे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेले अफूच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याचे मिळून आल्याने सदर मुद्देमालाचा जागीच पंचनामा करुन त्यामध्ये अफूची चो ९५३ लहान मोठी झाडे त्यास बोंडे असलेली वजन ३९.६८५ किलो असुन त्याची किंमत अंदाजे ११,४३,६००/-असा मुद्देमाल मिळून आला.पोकॉ.शाम बाबासाहेब गुंजाळ नेमणूक शेवगाव पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरुन एनडीपीएस कायदा सन १९८५ ते कलम ८(b), १८ प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला अहिल्यानगर, अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.समाधान नागरे,सपोनि.धरमसिंग सुंदरडे, सपोनि.अशोक काटे,पोहेकॉ/ चंद्रकांत कुसारे,पोहेकॉ/किशोर काळे,शाम गुंजाळ,संतोष वाघ,राहुल खेडकर,भगवान सानप,प्रशांत आंधळे,एकनाथ गर्कळ,संपत खेडकर,मपोकॉ.प्रियंका निजवे तसेच सायबर पोलीस स्टेशन येथील पोकॉ.राहुल गुड्डु,पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली असुन वरिल गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे शेवगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत.

No comments