युरोप येथे होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेकरिता चौगाव येथील वैष्णवी पाटील ची निवड.. विश्राम तेले चौगाव ता.चोपडा (संपादक -:-हेमकांत गायकवाड...
युरोप येथे होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेकरिता चौगाव येथील वैष्णवी पाटील ची निवड..
विश्राम तेले चौगाव ता.चोपडा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी अथलेटीका फिटनेस, सूरत येथे वर्ल्ड कप निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते त्यात भारतातील एकूण २६ राज्यातील कुडो राष्ट्रीय विजेत्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात पुणे जिल्हा मधून महाराष्ट्र राज्य मार्फत चौगाव ता.चोपडा ह.मु.पुणे येथील कु.वैष्णवी मनोज पाटील ची युरोप येथे ६ जुलै ते ११ जुलै २०२५ मधे होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हांशी मेहुल वोरा (प्रमुख कोच इंडिया) यांच्या मार्गदर्शनाखाली भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी युरोप येथे टीम इंडिया जाणार आहे सदर विजयी विद्यार्थ्यांना अरविंद मोरे अध्यक्ष- पुणे जिल्हा कुडो संघटना, प्रशिक्षक किशोर शिंदे यांनी केले. कु.वैष्णवी पाटीलच्या निवडीमुळे चौगाव परिसरातून तिचे अभिनंदन व वर्ल्डकपसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments