adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुंबई येथे नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन टोबॅको फ्री इंडिया अवॉर्डने ईडीआय विजय पवार सन्मानित २५ हजारांचा धनादेश सन्मानपत्र देऊन केला सत्कार

  मुंबई येथे नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन टोबॅको फ्री इंडिया अवॉर्डने ईडीआय विजय पवार सन्मानित २५ हजारांचा धनादेश सन्मानपत्र देऊन केला सत्कार  ...

 मुंबई येथे नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन टोबॅको फ्री इंडिया अवॉर्डने ईडीआय विजय पवार सन्मानित

२५ हजारांचा धनादेश सन्मानपत्र देऊन केला सत्कार 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

जळगाव पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग स संचालक विजय शांतीलाल पवार यांना मुंबई प्रेस क्लब येथे राजीव निवतकर (भा प्र से )आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई यांच्या शुभ हस्ते नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन २०२४-२५ चा टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड प्रदान करण्यात आला. सोबतच नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन तर्फे पंचवीस हजार रुपयाचा धनादेश देखील देण्यात आला.


याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉ विवेक पाकमोडे, सलाम मुंबई फाउंडेशन सी इ ओ नंदिता रामचंद्रन, एन एस फाउंडेशन सी इ ओ मनिष जोशी यांची उपस्थिती होती. शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्परीणामांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी, व्यसनमुक्त पिढी निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असतांना तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असतांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील, डॉ पंकज आशिया, श्री अंकित तसेच शिक्षणाधिकारी बी जे पाटील, बी एस अकलाडे, विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियानाची कार्यवाही करण्याबाबत कामकाज पाहिले. त्यांनी सलाम मुंबई फाउंडेशन च्या सहकार्याने शाळा मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांच्या कार्यशाळा घेऊन तंबाखूमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविले.त्यांच्या या कार्याची दखल घेत मिळालेल्या पुरस्कार बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments