यावल महाविद्यालयात गॅस सिलेंडर सुरक्षा दक्षता कार्यशाळा संपन्न यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प...
यावल महाविद्यालयात गॅस सिलेंडर सुरक्षा दक्षता कार्यशाळा संपन्न
यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत गॅस सिलेंडर वापरताना घ्यायची दक्षता या विषयावर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकसह कार्यशाळा प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच आयोजित करण्यात आली.
एलपीजी गॅस सिलेंडर वापरण्यासाठी सुरक्षितता महत्त्वाची आहे. अधिकृत विक्रेत्यांकडून गॅस सिलेंडरची खरेदी असल्याची खात्री करा, नेहमी आयएसआय मार्क असलेला गॅस सिलेंडरचा वापर करावा, सिलेंडर स्वीकारताना सिलेंडर योग्य रित्याशील केली जाते आणि त्याची सुरक्षा कॅप छेडछाड केलेली नाही याची खात्री करा अशा महत्त्वपूर्ण टिप्स सावदा येथील गौरव वाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गॅस जितके वापरणे सहज तितकेच त्यांच्यापासून अपघात जास्त होऊ शकतात, कोणत्याही कारणाने गॅस बाहेर आल्यास त्याचा वेग काही पटीने जास्त असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता व त्यामुळे होणारे नुकसान अधिक असते, यावेळी त्यांनी सांगितले तसेच रसायनशास्त्र प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. पवार, लॅब असिस्टंट श्री प्रमोद कदम, लॅब अटेंडंट श्री अनिल पाटील, श्री मनोज ख कंडारे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. आर. एस. शिरसाठ यांनी केले तर आभार अश्विनी कोल्हे यांनी मानले.


No comments