adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

  रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल-येथील शि...

 रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी 




भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल-येथील शिवरत्न फौंडेशन छत्रपती ग्रुप बोरावल गेट यांच्यावतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळेस सुरुवातीला सकाळी ११ वाजता मोटरसायकल सायकल रॅली काढण्यात आली यात शहरातील तरुणांनी मोठ्या उत्साहाने यात भाग घेतला  


संध्याकाळी सहा वाजता शिवचरित्र येथून  सदरील शिवजयंतीला मिरवणुकीला  वाजत गाजत डीजे च्या तालावर    मिरवणूक काढण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या

सदरील  मिरवणूक शिवतीर्थ पासून मेन रोड बेहेडे सुपर शॉप रेणुका माता मंदिर येथून पुढे शिवतीर्थ मैदानावरती मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळेस शहरातील प्रतिष्ठित नागरिक शिव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 


सदरील मिरवणुकीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव अध्यक्ष ऋषिकेश कोळी(तात्या) उपाध्यक्ष रुपेश कोळी खजिनदार सागर कोळी भरत भोई सल्लागार भरत बारेला सचिव सदस्य विजय कोळी महेश कोळी आकाश धनगर कुंदन सुतार शुभम पाटील राहुल झांबरे मनीष कोळी सुमित पवार तन्मय बोंडे लोकेश चौधरी यांच्यासह अनेक नागरिकांनी परिश्रम घेतले सदरील शिवजयंती उत्सव मिरवणुकीला शहरातील विविध मान्यवर सर्व राजकीय यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता

No comments