राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी इंजि. विनायक माळेकर त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे (संपादक -:- हेमकांत गा...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी इंजि. विनायक माळेकर
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.१०/०२/२०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)कार्यकर्ता सभासद मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार हरसुल गटातील जि.प.सदस्य तथा उपसभापती इंजि.विनायक माळेकर यांना जिल्ह्याप्रमुख विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या अध्यक्षतेखाली माळेकर यांना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, गेली अनेक वर्षे माळेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत असताना सर्व सामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात,तालुक्यात मोठ्या प्रमाणात संघटन असल्याने पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे माळेकरांनी सांगितले, यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोजताई अहिरे, जेष्ठ नेते संपत सकाळे, संचालक संदीप गुळवे,तालुका प्रमुख बहिरू मुळाने, महिला जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे,महिला अध्यक्ष भारतीताई खिरारी, युवा तालुका प्रमुख ज्ञानेश्वर महाले,समता प्रमुख गोकुळ बत्तासे, हरसुल शहरप्रमुख योगेश देवरगावकर,मिडीया प्रमुख सुरेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments