चोपडा शहरातील इंडस कंपनीचे दोन टॉवर सील चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) अकृषीक कराची थकबाकी पोटी चोपडा शहरातील इंडस कंपनीचे दोन...
चोपडा शहरातील इंडस कंपनीचे दोन टॉवर सील
चोपडा प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
अकृषीक कराची थकबाकी पोटी चोपडा शहरातील इंडस कंपनीचे दोन टॉवर सील करण्यात आले... मोबाईल टॉवर कंपन्यांना नियमानुसार नोटीस देऊन व सुचित करून देखील अकृषीक कराची रक्कम न भरल्यामुळे मोबाईल टॉवर सील करण्यात आले... सन २०२४-२५ या वर्षासाठी चोपडा तहसील कार्यालयाला नेमून दिलेल्या उद्दिष्ट कृतीसाठी विविध स्त्रोत शोधण्यात आलेल्या असून अकृषीक आस्थापनांनी दरवर्षी संबंधित तलाठी यांच्याकडे अकृषिक कर भरणा करणे आवश्यक आहे...
प्रति टॉवर बिगर शेती कर रुपये ४६५०० असून चोपडा शहर, व्यापारी बाजारपेठा आठवडे बाजाराची ठिकाणी, मंडळ मुख्यालयाची गावे या ठिकाणी निवास व वाणिज्य प्रयोजनासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी बिगरशेती झालेल्या आहेत,
त्या जमिनीचे मालक व वापरकर्ते यांनी बिगर शेती कर भरणे आवश्यक आहे त्यामुळे संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क साधून शासनास देय रक्कम अदा करावी, असे आवाहन करण्यात येते... सदरील कारवाई मंडळ अधिकारी चोपडा मनोज साळुंखे तलाठी चोपडा २ नईम तडवी यांनी केली असल्याचे समजते


No comments